Home /News /crime /

नवऱ्याशी भांडून माहेरी आली तरुणी; तिसऱ्याशी अफेअर असल्याच्या संशयाने प्रियकराने केली हत्या

नवऱ्याशी भांडून माहेरी आली तरुणी; तिसऱ्याशी अफेअर असल्याच्या संशयाने प्रियकराने केली हत्या

धक्कादायक म्हणजे तरुणाने स्वयंपाकघरातील तवा महिलेच्या गळ्यावर फेकला आणि यातच तिचा जागीच मृत्यू झाला.

    जयपूर, 19 डिसेंबर : राजस्थानातील (Rajasthan News) बाडमेरमध्ये विवाहित प्रियकराने विवाहित प्रेयसीची तव्याने गळा कापून हत्या (Murder) केली. प्रेयसीचे दुसऱ्याबरोबर संबंध असल्याचा तरुणाला संशय होता. याशिवाय महिलेचे तिच्या पतीसोबत भांडण सुरू होतं, म्हणून ती आपल्या माहेरी राहत होती. महिलेला तीन मुलंदेखील आहेत. बालोत शहरातील एका खोलीत 14 डिसेंबर रोजी सकाळी महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. बालोतरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. मृत राणकी हिची गळ्यावर धारदार शस्त्राचे निशाण सापडले आहेत. तर सर्वत्र रक्त सांडलं होतं. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टम करून नातेवाईकांकडे सोपवलं आहे. मृत महिलेच्या भावाने हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. 3 वर्षांपासून सुरू होतं प्रेम प्रकरण.. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानुसार, दोघांचं तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. महिला आधीपासून तरुणाला ओळखत होती. ती जेव्हा कधी माहेरी येत तरुणाची भेट घेत असे. सध्या मात्र पतीसोबत भांडण झाल्यानंतर महिला अनेक दिवसांपासून माहेरी आहे. अशात दोघांच्या भेटी वाढल्या. यादरम्याम महिलेचे आणखी दुसरीकडे प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या संशयातून तरुणाने भयावह पाऊल उचललं. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. भांडणं इतकं वाढलं की, तो महिलेला धमकी देऊन निघून गेला. रात्री जेव्हा महिला आपल्या घरी परतली तेव्हा हादेखील पुन्हा आला. स्वयंपाक घरात लोखंडाचा तवा उचलून गळ्यावर वार केला. हा वार इतका जबर होता की, महिलेचा जागीच मृत्यू झाला. हे ही वाचा-नवविवाहित नवरीच्या खोलीत पोलिसांची छापेमारी; धक्क्याने नवरदेवाची आई बेशुद्ध हत्येच्या 5 तासांपूर्वीचा सीसीटीव्ही फुटेज.. हत्येच्या अवघ्या 5 तासांपूर्वी आरोपी तरुण-तरुणी विश्नोई रुग्णालयाजवळ होते. याचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आला आहे. यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. त्याच रात्री तरुणाने प्रेयसीची हत्या केली. बालोतरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख पटवण्यात आली असून अवैध संबंधाच्या संशयातून ही हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये राहणारा शिशूपाल बालोतरा हा एका फॅक्टरीत काम करतो. तो कुम्हारा चौकात पत्नी आणि तीन मुलांसह भाड्याच्या घरात राहतो. तर राणकीचा पती जोधपूरमध्ये काम करतो. पती-पत्नीमधील वादामुळे गेल्या काही दिवसांपासून महिला माहेरी राहत होती.

    First published:

    Tags: Crime news, Murder, Rajasthan

    पुढील बातम्या