Home /News /crime /

नवविवाहित नवरीच्या खोलीत पोलिसांची छापेमारी; धक्क्याने नवरदेवाची आई झाली बेशुद्ध

नवविवाहित नवरीच्या खोलीत पोलिसांची छापेमारी; धक्क्याने नवरदेवाची आई झाली बेशुद्ध

सून घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार पाहून सासू जागीच बेशुद्ध झाली.

    पाटना, 18 डिसेंबर : बिहारचे (Bihar News) मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी सांगितलं की, राज्यात दारूबंदीचा निर्णय महिलांच्या मागणीनंतर घेण्यात आला. आता मात्र राज्य पोलीस नवविवाहित नवरीच्या खोलीत छापेमारी (Raid) करीत असताना दिसत आहे. या प्रकरणातील ताजी घटना हाजीपूर शहरातील हाथसरगंज भागातून समोर आला आहे. येथे राहणाऱ्या सीला देवीच्या घरी पोलिसांच्या टीमने छापेमारी केली. लग्नाच्या पाच दिवसात एका नवरीच्या खोलीत पोलिसांनी तोडफोडही केली. पोलीस तिच्या खोलीत दारूच्या बाटल्या शोधत होते. (Police raid newlyweds bride Navradevas mother is unconscious due to shock) नवविवाहित नवरी पूजा कुमारीने सांगितलं की, जेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांची एक टीम आली, तेव्हा मी बेडरूममध्ये होते. या टीममध्ये एकही पोलीस महिला कर्मचारी नव्हती. पोलीस खोलीत आले आणि सर्वत्र शोधाशोध करू लागले. बराच वेळ विचारल्यानंतर त्यांनी दारूच्या बाटल्या शोधत असल्याचं सांगितलं. ही स्थिती पाहून नवरदेवाची आई बेशुद्ध पडली. यानंतर नवरी म्हणाली की, माझी सासू बेशुद्ध झाल्यानंतरही पोलीस कर्मचारी शोधाशोध करीतच होते. हे ही वाचा-क्षुल्लक कारणानं विद्यार्थ्याला आला राग, शिक्षकालाच मारली कानशिलात; हे आहे कारण या छापेमारीनंतर घराबाहेर पडायला लाज वाटत असल्याचं सीला देवीने सांगितलं. आमच्या कुटुंबात कोणीच दारू पित नाही. मात्र तरीही पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय छापेमारी केली. या प्रकरणात वैशालीतील पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Crime news

    पुढील बातम्या