जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुणे : तीन मुलांच्या बापाचे दुसऱ्या महिलेशी संबंध, प्रेयसीने लग्नाचा तगादा लावला अन्

पुणे : तीन मुलांच्या बापाचे दुसऱ्या महिलेशी संबंध, प्रेयसीने लग्नाचा तगादा लावला अन्

प्रेयसीच्या हत्येची सुपारी

प्रेयसीच्या हत्येची सुपारी

बजरंग तापडे हा विवाहित असून त्याला तीन मुलेही आहे. मात्र, असे असूनही त्याचे या हत्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 26 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे. मागच्या 15 दिवसांपूर्वी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे एका महिलेची हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखा युनिट 5 ला या हत्येचा उलगडा झाला आहे. प्रेमसंबंधातून लग्नाचा तगादा लावल्याने सात लाखांची सुपारी देऊन या महिलेची हत्या करण्यात आली, असा खुलासा पोलीस तपासात झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधातून या महिलेची हत्या करण्यात आली. या महिलने लग्नाचा तगादा लावला होता. यामुळे आरोपीने तिच्या हत्येची सुपारी दिली होती. याप्रकरणी बजरंग मुरली तापडे (वय 45, रा. तळेगाव दाभाडे), पांडुरंग उर्फे सागर बन्सी हारके (वय 35, रा. मोशी), सचिन प्रभाकर थिगळे (वय 30, रा. बुलढाणा), सदानंद रामदास तुपकर (वय 26, रा.बुलढाणा) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी बजरंग तापडे हा विवाहित असून त्याला तीन मुलेही आहे. मात्र, असे असूनही त्याचे या हत्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून या महिलेने बजरंगकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, तो विवाहित असल्याने त्याने महिलेच्या हत्येची सात लाख रुपयांची सुपारी आरोपी पांडुरंग हारके याला दिली होती. त्यासाठी त्याने पांडुरंगला रोख चार लाख रुपयेही दिले होते. यानंतर आरोपी पांडुरंग हारकेने आरोपी सचिन थिगळेला एक लाख रुपये रोख दिला आणि महिलेचा फोटो दाखवत तिचा येण्या जाण्याचा मार्गही दाखवला. यानंतर आरोपी सचिन आणि त्याचा मित्र सदानंद यांनी महिलेच्या घराची पाहणी केली. 9 ऑगस्टला महिला स्कुटीवरून जात असताना आरोपी सचिन आणि सदानंद यांनी चारचाकी गाडी येत दिला अडवले. यावेळी आरोपींनी तिचे केस पकडले आणि धारधार चाकूने तिचा गळा चिरून खून करत घटनास्थळावरुन पळ काढला. हेही वाचा -  पुण्यातील धक्कादायक प्रकार! प्रोफेसर पत्नीकडून पतीवर काळी जादू? तरुणाने कोर्टात धाव यानंतर पोलिसांनी, तळेगाव दाभाडे ते चिंबळी असा 60 ते 65 किलोमीटर परिसरात माग काढला. आरोपी राहत असलेल्या ठिकाणी आजुबाजुला चौकशी केली आणि तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांना जेरबंद केले. अनैतिक संबंधातून या महिलेची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात