मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कुख्यात गुंडाच्या बायकोची काढली छेड, तिने असा घेतला बदला की तरुणाचे कापले लिंग

कुख्यात गुंडाच्या बायकोची काढली छेड, तिने असा घेतला बदला की तरुणाचे कापले लिंग

विनायक लोंढेची कर्ज देण्याच्या बहाण्याने पुनम समवेत ओळख झाली होती.

विनायक लोंढेची कर्ज देण्याच्या बहाण्याने पुनम समवेत ओळख झाली होती.

विनायक लोंढेची कर्ज देण्याच्या बहाण्याने पुनम समवेत ओळख झाली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 14 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यात आता पुण्यातून आणखी एक मोठी धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. कुख्यात गुंड निल्य वाडकरच्या बायकोने छेडछाडीला कंटाळून तरुणाचे लिंग कापल्याचा भयानक प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

आरोपी महिलेसह इतर तीन अज्ञात आरोपींनी मिळून तरुणाचे लिंग कापले. विनायक तानाजी लोंढे असे लिंग कापलेल्या तरुणाचे नाव आहे. तर पुनम निलेश वाडकर असे महिला आरोपीचे नाव आहे. गुंड निलेश वाडकर याचा काही वर्षांपूर्वी खून झाला आहे. तसेच त्याची पत्नी पुनम वाडकर ही सध्या बचत गटाच्या माध्यमातून काम करते.

फिर्यादी विनायक लोंढेची कर्ज देण्याच्या बहाण्याने पुनम समवेत ओळख झाली होती. ओळखीनंतर पूनमला फिर्यादी लोंढे व्हाट्सअॅपवर अश्लील चॅटिंग करत होता. यानंतर कंटाळलेल्या पूनमने आपल्या इतर तीन साथीदाराला सांगून त्याला भेटण्यास कात्रज जवळील स्वामीनारायण मंदिराजवळ बोलवले. यानंतर दुचाकीवर बसून कात्रज बोगद्याजवळ नेत त्याचा लिंग कापण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - पत्नीचा राग काढण्यासाठी पोटच्या मुलीचा घेतला जीव, आत्महत्येचा बनाव रचत केलं भयानक कांड

बस अडवून चालक-दुचाकीस्वार तरुणामध्ये हाणामारी -

पुण्यात वाहतुकीचे आधीच तीन तेरा वाजले आहे. अशातच एका पीएमपीएल बसचालक आणि दुचाकीस्वार दोन तरुणांमध्ये भर रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन चौकामध्ये ही घटना घडली आहे. स्वारगेट डेपोची बस क्रमांक सीएनजी 799 डी आर 2550 ही पुणे स्टेशन चौकात आली होती. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने बससमोर गाडी आडवी लावली आणि जोरदार वाद घातला. बघता बघता बाचाबाची हाणामारीमध्ये रुपांतरीत झाली.

भर रस्त्यावर दुचाकीस्वार तरुण आणि चालकामध्ये मारामारी सुरू झाली. लाथ आणि बुक्याने दोघे एकमेकांना मारहाण करत होते. त्याचवेळी या तरुणाचा मित्र सुद्धा मारण्यासाठी धावून आला. हे पाहून बसचालकाचा सहकारी वाहक खाली उतरला आणि या तरुणाला चांगलाच चोप दिला.

First published:

Tags: Police, Pune, Pune crime news