• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • धक्कादायक! पतीचा तो शब्द लागला जिव्हारी; महिलेनं ब्लेडनं स्वतःची जीभ कापून रस्त्यावर फेकली अन्...

धक्कादायक! पतीचा तो शब्द लागला जिव्हारी; महिलेनं ब्लेडनं स्वतःची जीभ कापून रस्त्यावर फेकली अन्...

पतीनं आपल्या पत्नीवर ओरडत तिला वाद घालणारी (Argumentative) आणि अफाट असल्याचं म्हटल्यानं पत्नीनं स्वतःची जीभ कापली (Woman Chopped off Her Tongue) आहे.

 • Share this:
  लखनऊ 15 सप्टेंबर : एका घटनेत पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून महिलेनं धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. पतीनं आपल्या पत्नीवर ओरडत तिला वाद घालणारी (Argumentative) आणि अफाट असल्याचं म्हटल्यानं पत्नीनं स्वतःची जीभ कापली (Woman Chopped off Her Tongue) आहे. ही भयंकर घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बिजनौर जिल्ह्यातून समोर आली आहे. जिल्ह्यातील रसूलपूर नागला गावात हा प्रकार घडला (Weird Incident) आहे. पावसामुळे शेती बरबाद, मराठा आरक्षण नसल्यानं मिळेना नोकरी;त्रस्त तरुणानं दिला जीव पतीच्या शब्दांमुळे दुखावलेल्या पत्नीनं हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. पीडित महिलेचं नाव बबली असं असून तिच्यावर सध्या अमरोहा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. हिंदी दैनिक जागरणनं दिलेल्या वृत्तानुसार महिलेचं आपला पती ब्रह्मपाल याच्याशी वारंवार भांडण होत होतं. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी या जोडप्याचं पुन्हा भांडण झालं आणि यावेळी हे भांडण शिगेला पोहोचलं. हप्ता देण्यास नकार दिल्याने गावगुंडांकडून बिअरच्या बाटल्यांनी हल्ला, घटनेचा CCTV भांडणानंतर महिलेने एका दुकानात जाऊन ब्लेड खरेदी केलं. यानंतर तिनं याच ब्लेडनं आपल्या पतीसमोर उभा राहून स्वतःची जीभ कापली आणि रस्त्यावर फेकून दिली. जीभ कापल्यानंतर महिला रक्तानं अक्षरशः भिजली होती. नंतर महिलेच्या पालकांनी तिला अमरोहा येथील धानोरा रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत नोकराला तरुणाच्या मोबाईलमध्ये सापडले आक्षेपार्ह फोटो, 1 लाख मागत केलं ब्लॅकमेल बबली आणि ब्रह्मपाल यांचं 10 वर्षापूर्वी लग्न झालं आहे. या जोडप्याला दोन मुलंही आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: