मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लैंगिक संबंधानंतर युवकाने केलं ब्लॉक; बदला घेण्यासाठी तरुणीचा भलताच प्रताप, कोर्टाने तिलाच ठरवलं दोषी

लैंगिक संबंधानंतर युवकाने केलं ब्लॉक; बदला घेण्यासाठी तरुणीचा भलताच प्रताप, कोर्टाने तिलाच ठरवलं दोषी

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तीच्या वकिलांनी सांगितलं की साल 2017 मध्ये एकमेकांच्या सहमतीने दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर या तरुणाने महिलेला सोशल मीडियावर ब्लॉक केलं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 डिसेंबर : एका व्यक्तीने महिलेसोबत शारीरिक संबंध (Sexual Relation) ठेवल्यानंतर तिला सोशल मीडियावर ब्लॉक केलं. यामुळे ही महिला इतकी नाराज झाली की तिने आपल्या या मित्राला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आणि त्याच्यावर बलात्कार (Fake Rape Allegations) तसंच चोरीचा आरोप लावला. मात्र कोर्टाने महिलेचे आरोप निराधार असल्याचं सांगितलं. तसंच मित्राला हत्येची धमकी (Threat of Murder) दिल्याप्रकरणी तिलाच दोषी घोषित केलं. ही घटना ऑस्ट्रेलियातील आहे.

विवाहितेसोबत विकृतीचा कळस; मूल होण्याचं औषध देण्याच्या बाहण्याने बोलावलं अन्...

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या एडिलेडमध्ये महिलेनं आपल्या पुरुष मित्राला जीवे मारण्याची तसंच खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी दिली. याप्रकरणी ती दोषी सिद्ध झाली आहे, तिने मित्रावर बलात्काराचा आरोपही केला होता. एडिलेड जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरु असताना या व्यक्तीच्या वकिलांनी सांगितलं की साल 2017 मध्ये एकमेकांच्या सहमतीने दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर या तरुणाने महिलेला सोशल मीडियावर ब्लॉक केलं. याच गोष्टीमुळे नाराज होऊन महिलेनं त्याला धमकी देण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर तिनं आपल्या मित्रावर बलात्कार तसंच डेबिट कार्ड चोरून पैसे खर्च केल्याचा आरोपही केला.

महिलेनं असा दावा केला, की त्यादिवशी या तरुणाने दारू प्यायली होती. त्याने बलात्कार करण्यासाठी मलाही बेशुद्ध केलं. बेशुद्धीच्या अवस्थेत सहमती कशी दिली जाऊ शकते, असा सवाल तिने केला. महिलेनं कोर्टात पुरावा दिला की मी सोशल मीडियावर कोणालाही त्रास दिला नाही. तसंच तिने हा आरोपही फेटाळला की तरुणाने ब्लॉक केल्यामुळे नाराज होऊन तिने हे आरोप केले आहेत.

वेदनेनं व्याकूळ असतानाही नाकारला प्रवेश; रुग्णालयाच्या दारातच महिलेची प्रसूती

कोर्टातील सरकारी वकिलांनी असा दावा केला की ब्लॉक केलं गेल्यानं तरुणीचा पारा चढला. यामुळे महिलेनं आपल्या मित्राच्या विरोधात बलात्काराचा आरोप केला. इतकंच नाही तर महिलेनं फेक फेसबुक अकाऊंट उघडून या तरुणाला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देत जीवे मारण्याची धमकीही दिली. इतकंच नाही तर डोकं कापण्याचे तसंच खून झालेल्या शरीराचे फोटो पाठवण्याआधी नरभक्षणाबद्दल मेसेजही केले.

सध्या न्यायालयाने महिलेला तिच्या पुरुष मित्राला जीवे मारण्याची धमकी देणे, अत्याचार करणे, त्याच्या कुटुंबाला त्रास देणे या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. जानेवारीत होणाऱ्या सुनावणीदरम्यान महिलेला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सध्या ही महिला जामिनावर बाहेर आहे.

First published:

Tags: Rape case