मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई: 22 वर्षीय विवाहितेसोबत विकृतीचा कळस; मूल होण्याचं औषध देण्याच्या बाहण्यानं बोलावलं अन्...

मुंबई: 22 वर्षीय विवाहितेसोबत विकृतीचा कळस; मूल होण्याचं औषध देण्याच्या बाहण्यानं बोलावलं अन्...

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Crime in Satara: सातारा जिल्ह्यातील वाई याठिकाणी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने मूल होण्याचं औषध देण्याच्या बहाण्याने एका 22 वर्षीय विवाहितेसोबत विकृतीचा कळस गाठला आहे.

  • Published by:  News18 Desk

वाई, 23 डिसेंबर: सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई (Vai) याठिकाणी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने मूल होण्याचं औषध देण्याच्या बहाण्याने (aayurvedik treatment for become pregnant) एका 22 वर्षीय विवाहितेसोबत विकृतीचा कळस गाठला आहे. नराधम आरोपीनं पीडित महिलेचा पती आणि सासूचा विश्वास संपादन करून पीडित महिलेवर बलात्कार (married woman raped) केला आहे.

यानंतर आरोपीनं पीडित महिलेला यवतमाळ याठिकाणी घेऊन जात तिला मारहाण करत पुन्हा बलात्कार केला आहे. याप्रकरणी मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. पण अत्याचाराची घटना वाईत घडल्यानं  हा गुन्हा वाई पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

विठ्ठल गणपत पवार असं गुन्हा दाखल झालेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. नराधम आरोपीची पीडितेच्या पतीशी आणि सासूशी ओळख आहे. आपल्या सासरवाडीत मूल होण्याचं आयुर्वेदिक औषध मिळत असल्याची बतावणी आरोपीनं पीडितेच्या पतीकडे आणि सासूकडे केली होती. पीडितेचा पती आणि सासूचा विश्वास संपादन करून आरोपी पीडितेला मुंबईहून वाई याठिकाणी घेऊन आला होता.

हेही वाचा-जादूटोण्याच्या संशयातून पतीचं पत्नीसोबत विचित्र कृत्य; भयावह अवस्थेत आढळली महिला

याठिकाणी आल्यानंतर आरोपीनं पीडित महिलेला एका अपार्टमेंटमध्ये कोंडून ठेवलं. यानंतर नराधमाने पीडित महिलेला मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर तो पीडितेला चुलत्याच्या गावी यवतमाळ याठिकाणी घेऊन गेले. येथेही आरोपीनं पीडितेला मारहाण करून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारेल, अशी धमकी देऊन आरोपीनं पीडितेला सोडून दिलं.

हेही वाचा-चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवत आईवर केला बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

आपल्या घरी मुंबईला परतल्यानंतर पीडित महिलेनं कुर्ला पोलीस ठाण्यात जाऊन विठ्ठल गणपत पवार याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पण हे प्रकरण वाई शहरात घडला असल्याने पोलिसांनी हा गुन्हा वाई पोलिसांकडे वर्ग केला आहे. या घटनेचा पुढील तपास वाई पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai, Rape, Satara