मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संतापजनक! वेदनेनं व्याकूळ असतानाही नाकारला प्रवेश; जीवघेण्या थंडीत महिलेची रुग्णालयाच्या दारात प्रसूती

संतापजनक! वेदनेनं व्याकूळ असतानाही नाकारला प्रवेश; जीवघेण्या थंडीत महिलेची रुग्णालयाच्या दारात प्रसूती

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Crime in Beed: बीडमधील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या एका महिलेला आरोग्य कर्मचाऱ्याने थेट प्रवेश नाकारला आहे.

बीड, 23 डिसेंबर: बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील मादळमोही प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या एका महिलेला आरोग्य कर्मचाऱ्याने थेट प्रवेश नाकारला (woman health worker refused to admit pregnant woman) आहे. पीडित महिला प्रसूतीच्या वेदनेनं व्याकूळ असताना देखील आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्याने त्यांना दाखल करुन घेण्याऐवजी बीड येथील जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

पीडित महिलेच्या पतीने आणि नातेवाईकांनी अनेकदा विनवणी करून देखील महिला आरोग्य कर्मचाऱ्याने थोडीही माणुसकी दाखवली नाही. पीडित महिला प्रसूतीच्या वेदनेनं विव्हळत असताना देखील महिला कर्मचाऱ्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही. त्यामुळे संबंधित गरोदर महिलेची जीवघेण्या कडाक्याच्या थंडीत आरोग्य केंद्राच्या आवारात प्रसूती झाली. ही संतापजनक घटना दोन दिवसांपूर्वी मंगळवारी रात्री घडली आहे. या प्रकारानंतर रुग्णालयाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा-गोळी खाऊन घरबसल्या करा कोरोना उपचार; मृत्यूचा धोका कमी, इथे Paxlovid ला मंजुरी

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा कृष्णा माळी असं पीडित महिलेचं नाव आहे. त्या गेवराई तालुक्यातील तांदळा येथील रहिवासी आहेत. पीडित सुरेखा यांना मंगळवारी रात्री प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आणलं. मात्र याठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी तपासणी न करता 'तुम्ही बीडला जा' असं म्हणत जबाबदारी झटकली.

हेही वाचा-मोठी बातमी: Omicron व्हेरिएंटवर दक्षिण आफ्रिकेत अभ्यास, झाले धक्कादायक खुलासे

यावेळी पीडितेच्या नातेवाईकांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडे अनेकदा विनवणी केली. तरीही त्यांनी वेदनेनं व्याकूळ झालेल्या महिलेला आरोग्य केंद्रात दाखल केलं नाही. विशेष म्हणजे यावेळी महिला कर्मचाऱ्याच्या पतीने देखील यामध्ये हस्तक्षेप केला आणि पीडितेला दाखल करून घेण्यास नकार दिला. या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित महिलेची आरोग्य केंद्राच्या दारातच कडाक्याच्या थंडीत प्रसूती झाली. हा संतापजनक प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे ओढावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

तर आरोग्य केंद्रात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असताना, प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची तपासणी का केली नाही? या बेजबाबदार महिला कर्मचाऱ्यासह त्या दिवशी कोणत्या डॉक्टरची ड्युटी होती? ते डॉक्टर हॉस्पिटलमध्ये होते की त्यांनीही दांडी मारली होती? याची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिलेच्या पतीसह नातेवाईकांनी केली आहे.

First published:

Tags: Beed, Crime news