लखनऊ 08 जानेवारी : एका नवविवाहित महिलेनं अतिशय धक्कादायक पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या झांसी येथील मऊरानीपुर क्षेत्रात घडली. ज्यात एका नवविवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती सकाळी घरातील लोकांना समजताच सगळ्यांना धक्का बसला. नातेवाईकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. कोतवाली पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपासानंतर कारवाई सुरू केली. आणखी एक हादरवणारं कांड! पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले अन्…, धक्कादायक कारण समोर घटनेबाबत विवेक रायकवार यांनी सांगितलं की, रात्री पत्नीसोबत जेवण करून ते कामावर गेले होते. रात्री बोलणं झाल्यानंतर पत्नी झोपण्यासाठी गेली होती, असं पतीनं सांगितलं. मात्र सकाळी कुटुंबीयांना ती फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर धक्काच बसला. महिलेनं दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत महिलेच्या पतीने सांगितलं की ‘जवळपास दीड वर्षापूर्वी त्याने मुस्कानसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. या लग्नासाठी मुस्कानच्या घरचे तयार नव्हते. मात्र तरी घरच्यांच्या विरोधात जात तिने सगळं सोडून माझ्यासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर सगळं व्यवस्थित सुरू होतं. अशात पत्नीनं इतकं मोठं पाऊल का उचललं हेच समजलं नाही’ सध्या पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तपास करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. माता न तू वैरिणी, आईनेच तीन दिवसाच्या बाळाची केली हत्या; धक्कादायक कारण आलं समोर दुसरीकडे पोलिसांनी घटनेबाबत सांगितलं की, तपास सुरू असून पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणाकडूनही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.