कोलकाता 07 जानेवारी : दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडासारखंच आणखी एक प्रकरण पश्चिम बंगालमधूनही समोर आलं आहे. पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले आणि ते नदीत फेकून दिले. पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. 20 वर्षीय तरुणाने पोलिसांना सांगितलं की, प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याने पत्नीचा वार करून खून केला, तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला कालव्यात फेकून दिले. रेणुकाच्या शरीराचे काही भाग अद्याप सापडले नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून तिस्ता कालव्यात मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध घेतला जात आहे. मोहम्मद अन्सारुलला गुरुवारी सिलीगुडी कोर्टात हजर करण्यात आलं, न्यायालयाने त्याला दोन आठवड्यांची पोलीस कोठडी सुनावली. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणावर शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. रेणुका खातून (३०) असं मृत महिलेचं नाव असून, मोहम्मद अन्सारुल असं तिच्या पतीचं नाव आहे. नात्याला काळिमा! आईने तोंड दाबलं आणि बापानं स्वतःच्याच 7 वर्षीय मुलीवर केले लैंगिक अत्याचार पोलीस सूत्रांनी सांगितलं की, अन्सारुल आणि रेणुका खातून यांचं लग्न सहा वर्षांपूर्वी झालं असून त्यांना एक लहान मुलगा आहे. ते सिलीगुडी महापालिकेच्या प्रभाग 43 अंतर्गत येणाऱ्या दादाभाई कॉलनीत राहत होते. रेणुकाच्या कुटुंबीयांनी ख्रिसमसच्या वेळी सिलीगुडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली कारण आदल्या दिवसापासून तिच्याशी फोनवर किंवा वैयक्तिकरित्या संपर्क होऊ शकला नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबर रोजी रेणुकाच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, प्राथमिक तपासात मृत महिलेचा पतीच संशयित असल्याचं निष्पन्न झालं. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. America Crime News : 4 वर्षीय मुलासह कुटुंबातल्या सात जणांवर गोळ्या झाडल्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल अवैध संबंधांच्या संशयावरून अन्सारुलने पत्नी रेणुकाची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. रेणुका सिलीगुडी येथे ब्युटीशियन कोर्सला जात असे. 24 डिसेंबरपासून ती बेपत्ता होती. चौकशीत अन्सारुलने त्याच दिवशी पत्नीला जवळच्या फणसडेवा येथे नेऊन तिची हत्या केल्याची कबुली दिली. मृतदेह कालव्यात टाकण्यापूर्वी मृतदेहाचे दोन तुकडे केले असल्याचं त्याने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.