लातुर, 07 जानेवारी : जन्मदात्या आईने तीन दिवसांच्या बाळाचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. दुसरीही मुलगीच झाल्याने आईने नवजात बाळाचा गळा दाबला. याप्रकरणी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गातेगाव पोलिसात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यात गातेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आईनेच तीन दिवसाच्या बाळाचा गळा दाबून खून केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील होळी इथल्या रेखा किसन चव्हाण या बाळंतपणासाठी माहेरी काटगाव तांडा इथं आल्या होत्या. त्यांना गेल्या आठवड्यात २७ डिसेंबर रोजी जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल केलं होतं. हेही वाचा : पुजाऱ्याने महिलेला लाथ मारून केस ओढत मंदिराबाहेर काढलं; संतापजनक VIDEO, काय आहे प्रकरण? प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेने मुलीला जन्म दिला. आधीही मुलगी असून आता दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने महिलेनं रूमालाच्या सहाय्याने तीन दिवसांच्या बाळाचा खून केला. पोलिसांच्या तपासातही महिलेनं खून केल्याचं निष्पन्न झालं आहे. गातेगाव पोलिसात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.