मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Matrimonial website वर लग्नाचं वचन देऊन तरुणीला घातला 22 लाखाला गंडा; पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

Matrimonial website वर लग्नाचं वचन देऊन तरुणीला घातला 22 लाखाला गंडा; पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

गेल्या वर्षी जूनमध्ये ही महिला एका डॉक्टरच्या संपर्कात आली होती. त्यानं परदेशात वैद्यकीय प्रॅक्टिस असल्याचं भासवल्याचा आरोप आहे. दोघांनी फोन, मेसेंजर आणि व्हिडिओ कॉलवर संवाद साधण्यास सुरुवात केल्यानंतर त्या व्यक्तीनं तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं.

पुढे वाचा ...

पुणे, 18 मार्च : एका विवाहविषयक वेबसाइटवर (Matrimonial website) भेटलेल्या डॉक्टरनं लग्नाचं वचन देऊन महिलेची तब्बल 22 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तिनं हे पैसे आठ महिन्यांच्या कालावधीत या डॉक्टरकडे हस्तांतरित केले होते. या विशीतल्या तरुणीनं पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असून ती पिंपरी-चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) तिच्या आईसोबत राहते. तिनं याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला (pimpri chinchwad crime news) आहे.

पोलिसांनी या डॉक्टर आरोपीविरुद्ध तोतयागिरी आणि फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमं लावली आहेत.

तक्रारीनुसार, गेल्या वर्षी जूनमध्ये ही महिला एका डॉक्टरच्या संपर्कात आली होती. त्यानं परदेशात वैद्यकीय प्रॅक्टिस असल्याचं भासवल्याचा आरोप आहे. दोघांनी फोन, मेसेंजर आणि व्हिडिओ कॉलवर संवाद साधण्यास सुरुवात केल्यानंतर त्या व्यक्तीनं तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं.

हे वाचा - ऑनलाईन केक खरेदी करताय? सावधान! पुण्यात महिलेला बसला तब्बल 65 हजारांचा भुर्दंड

या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील म्हणाले, “डॉक्टर असल्याचं भासवून सायबर घोटाळेबाजांनी फिर्यादीकडून विमान प्रवासाचा खर्च, बँक खाती गोठवल्यानंतर लागणारे पैसे, सोन्यावरील कर, काही प्रकारचे कर अशा बहाण्यांनी पैसे घेतले. अशा प्रकारचे तिला सुमारे 20 व्यवहार (transfer) करण्यास सांगितले होते. ते तिनं स्वतःच्या आणि तिच्या आईच्या बँक खात्यांमधून केले होते."

हे वाचा - मुलीला त्रास देणाऱ्याला घरात कोंडून दांडक्याने मारहाण, पुण्यातील तरुणाचा मृत्यू

अशी व्यक्ती अस्तित्वात नाही आणि आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेतली. फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेले फोन नंबर आणि बँक खात्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

First published:

Tags: Crime news, Cyber crime, Pimpari chinchawad