Home /News /pune /

Pune News: मुलीला त्रास दिल्याचा आरोप, तरुणाला घरात कोंडून बेदम मारहाण, उपचारादरम्यान झाला मृत्यू

Pune News: मुलीला त्रास दिल्याचा आरोप, तरुणाला घरात कोंडून बेदम मारहाण, उपचारादरम्यान झाला मृत्यू

मुलीला त्रास देणाऱ्याला घरात कोंडून दांडक्याने मारहाण, पुण्यातील तरुणाचा मृत्यू

मुलीला त्रास देणाऱ्याला घरात कोंडून दांडक्याने मारहाण, पुण्यातील तरुणाचा मृत्यू

Pune youth beaten to death by girl parents: पुण्यातील एका तरुणाला मुलीच्या कुटुंबीयांकडून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे.

पुणे, 18 मार्च : आपल्या मुलीला त्रास देतो असा आरोप करत मुलीच्या कुटुंबीयांनी एका तरुणाला बेदम मारहाण (youth beaten) केली आहे. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्यातील शिवणे परिसरात (Shivane area of Pune) ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? शिवणे येथील दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडन्सी मधील वंदना नावाच्या महिलेने मुलीला त्रास देतो म्हणून एका तरुणाला मारहाण केली आहे. कोथरूड येथील प्रद्युम्न प्रकाश कांबळे (वय वर्ष 22) या युवकाला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. बुधवारी संध्याकाळी घरी मुलीला भेटायला आलेल्या प्रद्युम्नला मुलीच्या आईने घरात का आला? यावरून जाब विचारला असता झालेल्या वादावादीमध्ये वंदना यांनी प्रद्युम्न याला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून जखमी केले. वाचा : ऊस तोडणी मजूर पुरवणाऱ्या ठेकेदाराची हत्या, शीर धडावेगळे करुन कोल्हापुरात फेकले त्यानंतर तेथून निसटून पळाला असता त्याचा पाठलाग करून दांगट पाटील नगर येथील रस्त्यावर त्याला दोन युवकांच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता युवकाला मारहाण करून दोन जण रिक्षामधून पळून गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. प्रद्युम्न कांबळे याला वारजे माळवाडी येथील माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु होते मात्र काल त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित महिलेला, तिच्या पतीला, मुलाला आणि त्याच्या मित्राला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. वाचा : हुक्का पार्टीत अश्लीलतेचा नंगानाच, 18 वेश्यांसोबत भलत्याच अवस्थेत आढळले 52 तरुण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगा हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहे. तर या प्रकरणातील चार ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 15 कोटींचं आमिष दाखवून 3 कोटींचा लावला चुना 15 कोटींचं कर्ज देण्याच्या बहाण्याने एका महिलेनं पवई येथील रहिवासी असणाऱ्या एका व्यावसायिकाला तब्बल 3 कोटींचा चुना लावला आहे. आरोपी महिलेनं अस्तित्वात नसलेल्या बँकेचे 5 पे ऑर्डर देऊन व्यावसायिकाची फसवणूक केली होती. याप्रकरणी जानेवारी 2019 मध्ये पवई पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील तीन वर्षे तपास केल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित महिलेविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Murder, Pune

पुढील बातम्या