Home /News /pune /

ऑनलाईन केक खरेदी करताय? सावधान! पुण्यात महिलेला बसला तब्बल 65 हजारांचा भुर्दंड, कारण...

ऑनलाईन केक खरेदी करताय? सावधान! पुण्यात महिलेला बसला तब्बल 65 हजारांचा भुर्दंड, कारण...

पुण्यातील वाकड भागात राहणाऱ्या महिलेला सायबर फसवणुकीचा (cyber fraud) सामना करावा लागला आहे.

    पुणे, 17  मार्च : सध्या जग डिजीटल झालं आहे. तुम्हीही अनेकदा पैसे डिजीटल पेमेंट (Digital Payment) पद्धतीने देत असाल. ही पद्धत सोपी असल्याने लोकप्रिय झाली आहे. पण या पद्धतीत सायबर गुन्हेगारांकडून (Cyber Criminal) फसवणूक (Fraud) होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पुण्यातील वाकड भागात राहणाऱ्या एका महिलेला अशाच सायबर फसवणुकीचा (cyber fraud) सामना करावा लागला आहे. या 30 वर्षांच्या महिलेने ऑनलाईन केक बूक केल्यावर तिला एक फोन कॉल आला आणि तिने त्या व्यक्तीला बँक डिटेल्ससह ओटीपीही (OTP) सांगितला. त्यानंतर तिच्या बँक खात्यातून तब्बल 65 हजार 191 रुपये ऑनलाईन चोरीला गेले, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. याबाबतचं वृत्त 'इंडियन एक्सप्रेस'नं दिलं आहे. वाकड पोलीस ठाण्यामध्ये (Wakad Police Station) या महिलेने सायबर फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे. त्याचा प्राथमिक माहिती अहवाल (FIR) पोलिसांनी नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने बुधवारी (16 मार्च 22) पोलिसांत तक्रार दाखल केली. वाकडमध्ये राहणाऱ्या या 30 वर्षांच्या महिलेने 14 फेब्रुवारी 22 ला दुपारी ऑनलाईन पद्धतीने एक केक बूक केला. काही वेळाने तिला देवेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने तिच्या फोनवर कॉल केला. कुमारने तिला तिचे बँक खात्याचे डिटेल्स (Bank Account Details) भरण्यासाठी एक लिंक पाठवतो आणि त्यात तुमचे बँक डिटेल्स भरा, असं सांगितलं. त्याने तिला लिंक पाठवली, त्यात तिने बँक खात्याची माहिती भरून पाठवली. त्यानंतर त्या महिलेच्या फोनवर वन टाईम पासवर्ड (One Time Password (OTP) आला. तो पासवर्ड सांगण्याची विनंती देवेंद्र कुमारने केल्यावर त्या महिलेने हा OTP ही त्याला सांगितला. (तेजस मोरे-प्रवीण चव्हाणांचं फोनवरील संभाषण समोर? कॉल रेकॉर्ड्समध्ये अनेक खुलासे) त्यानंतर काही क्षणांतच तक्रारदार महिलेच्या बँक खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे पाच मेसेजेस तिला फोनवर आले. त्यात मिळून तिच्या खात्यातून 65 हजार 191 रुपये त्या सायबर चोराने चोरले. ही पाचही ट्रँझॅक्शन (Five Online Transactions) होण्यापूर्वी कुठलीही माहिती बँकेच्या वतीने अप्रूव्हलसाठी महिलेला विचारण्यात आली नाही, असं या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. त्या सायबर चोराने त्या महिलेचा आधार आणि पॅन कार्ड क्रमांक वापरून तिच्याच नावे बँकेत वेगळं खातं उघडून त्यामध्ये ही रक्कम जमा केली. त्याने त्या खात्याचा गैरवापरही केला. त्यामुळे त्या महिलेला तिच्या खात्यातून चोरीला गेलेले पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतर या महिलेने पोलीस ठाणे गाठून आपली सायबर फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. वाकड पोलीस ठाण्यामधील सब इन्स्पेक्टर दीपक काडबाने यांनी सांगितलं की, त्यांनी अज्ञात सायबर चोराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 419 आणि 420 कलामांतर्गत तसंच इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अक्ट (Sections 419 and 420 of the Indian Penal Code and sections of the Information Technology Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणा दीपक काडबाने यांच्या नेतृत्वातील टीम पुढील तपास करत आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
    First published:

    पुढील बातम्या