भोपाळ 10 सप्टेंबर : अनेकदा आपण रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला उभा असलेले लोक लिफ्ट मागताना दिसतात. मात्र, कधीकधी अशा व्यक्तींना लिफ्ट देणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये एका महिलेनं लिफ्ट मागून पुढे जे काही केलं ते अतिशय धक्कादायक होतं. नोकरीच्या शोधात मुंबईत आला भावोजी, अन या कारणामुळे मेहुण्याने केलं भयानक कृत्य रात्री सुनसान रस्त्यावर उभं राहून महिलेने लिफ्ट मागितली. रस्त्याने जाणाऱ्याने लिफ्ट दिल्यावर चाकूचा धाक दाखवून महिलेनं लूटमार केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गांधीनगर भागातील सुपर कॉरिडॉरवर रात्र होताच एक महिला एकटी उभी राहाते. तिथून एखादी व्यक्ती जाताना पाहून ती त्याला लिफ्टसाठी थांबवते. सुनसान भागात उभी असलेली महिला पाहून लोक तिला लिफ्ट देतात. महिलेला ज्याच्याकडून लिफ्ट घ्यायची असते त्याला ती डिअर असं म्हणून थांबवते. तिच्या बोलण्यावरून ड्रायव्हर तिला हाय प्रोफाईल स्त्री समजतो आणि तिच्या बोलण्यात येऊन सहज लिफ्ट देतो. गाडी निर्जन भागात पोहोचताच महिला या व्यक्तीला थांबवून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देते आणि लूट करते. एखाद्याने विरोध केला तर चाकू दाखवून महिला त्याला लुटते. पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घातल्याने घडली भयानक घटना, पेण पोलिसांकडून पतीला अटक अशाच एका लुटमारीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे काही व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओच्या आधारे पोलीस वेगवेगळ्या भागात रात्रीची गस्त घालतील आणि आरोपींचा शोध घेतील. एसीपी रुबिना मिर्झा यांनी सांगितलं की, तक्रारदाराने तक्रार केली आहे. आम्ही या घटनेचा तपास करत आहोत. लवकरच आरोपींना पकडलं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.