मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नोकरीच्या शोधात मुंबईत आला भावोजी, अन या कारणामुळे मेहुण्याने केलं भयानक कृत्य

नोकरीच्या शोधात मुंबईत आला भावोजी, अन या कारणामुळे मेहुण्याने केलं भयानक कृत्य

 इंद्रजीत आणि आरोपी लड्डू कुमार हे एकमेकांचे मेहुणा आणि भावोजी होते.

इंद्रजीत आणि आरोपी लड्डू कुमार हे एकमेकांचे मेहुणा आणि भावोजी होते.

इंद्रजीत आणि आरोपी लड्डू कुमार हे एकमेकांचे मेहुणा आणि भावोजी होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 9 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे समोर येत आहेत. राज्यातील अनेक भागात हत्येच्या, चोरीच्या घटना घडत असताना दिसत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. एका किरकोळ कारणावरुन भावोजीने आपल्याच मेहुण्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना अंधेरीत घडली. इंद्रजीत पासवान असे 45 वर्षीय मृताचे नाव आहे. तर लड्डू कुमार, असे 28 वर्षीय अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

मृत इंद्रजीत आणि आरोपी लड्डू कुमार हे एकमेकांचे मेहुणा आणि भावोजी होते. इंद्रजीत पासवान हा चार दिवसांपूर्वीच नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. इथे आल्यानंतर तो आपला नातेवाईक राम किशोरसोबत राहत होता. राम किशोरसोबत याठिकाणी त्याचा अन्य एक नातेवाईक लड्डू कुमारही राहत होता. तर लड्डू कुमार नात्याने इंद्रजीतचा भावोजी लागायचा.

गणपती दर्शनासाठी राम किशोर हा मंगळवारी सायंकाळी उशिरा गेला होता. यानंतर दर्शन घेऊन तो परत आला तेव्हा त्याला इंद्रजित हा त्याच्या दुकानाबाहेर खुर्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. यावेळी मग राम किशोरने त्याचा भाऊ देवेंद्र याला बोलावून घेतले आणि इंद्रजीतला रुग्णालयात दाखल नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेची माहिती अंधेरी पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, यानंतर तपासात राम किशोरचा त्याच्यासोबत राहणारा नातेवाईक लड्डू कुमार बेपत्ता आहे, असे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी रामकिशोरच्या दुकानाची झडती घेतली. यावेळी लड्डू कुमार हा आतमध्ये लपलेला आढळून आला. त्यामुळैे त्याला पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा - पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घातल्याने घडली भयानक घटना, पेण पोलिसांकडून पतीला अटक

पोलिसांसमोर दिली कबूली -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजित दारूच्या नशेत होता आणि लड्डू कुमारला शिवीगाळ करू लागला. यामुळे लड्डू कुमारला राग आला आणि त्याने रागाच्या भरात जवळच पडलेल्या लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी लड्डू कुमारला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तसेच या दोघांमध्ये काही जुने वैमनस्य होते की हत्येमागे आणखी काही कारण होते, याबाबतही तपास करत आहोत, अशी माहिती झोन ​​10 चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी दिली.

First published:

Tags: Andheri, Crime news, Murder