मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पहाटे 3 वा. उठला; 6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा चिरला गळा, सकाळी म्हणाला...

पहाटे 3 वा. उठला; 6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा चिरला गळा, सकाळी म्हणाला...

अंकितची पत्नी 6 महिन्यांची गर्भवती होती.

अंकितची पत्नी 6 महिन्यांची गर्भवती होती.

अंकितची पत्नी 6 महिन्यांची गर्भवती होती.

    लखनऊ, 15 ऑगस्ट : गाजियाबादच्या नंदग्राम पोलीस ठाणे हद्दीतील मोरटी गावात सोमवारी पहाटे तीन वाजता एक धक्कादायक प्रकार घडला. गावातील अंकित नावाच्या तरुणाने सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या आपल्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर अंकित सकाळी पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांकडे आपला गुन्हा कबुल केला. त्याने स्वत: पोलिसांना पत्नीची हत्या केल्याचं सांगितलं. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. चौकशी केली असता त्याने सांगितलं की, अवैध संबंधातून पत्नीची हत्या करण्यात आली. साहिबाबादच्या गरिमा गार्डन निवासी तनूचे वडील रमेश पाल यांनी सांगितलं की, सहा वर्षांपूर्वी त्यांनी आपली मुलगी तनूपालचं लग्न नंदग्राममधील मोरटी निवासी पतराम पाल यांचा मुलगा अंकित पालसोबत केलं होतं. Shocking! न्यायालयाचा तो निर्णय ऐकला अन् कोर्टातच पतीने चिरला पत्नीचा गळा; महिलेचा मृत्यू त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे की, लग्नानंतर अंकित पाल आणि त्याचे वडील हुंड्यासाठी त्रास देत होते. अनेकदा तिला मारहाण देखील केली जात होती. यातूनच अंकितने रविवारी रात्री त्यांच्या मुलीची हत्या केली. नंदग्राम पोलीस ठाण्याचे प्रभारी मुनेंद्र कुमारने सांगितलं की, आरोपी पती अंकित पाल याला अटक करण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Uttar pradesh news, Wife and husband

    पुढील बातम्या