बंगळुरू 14 ऑगस्ट : कौटुंबिक न्यायालयात एक अतिशय धक्कादायक घटना घडली. कर्नाटकच्या या न्यायालयात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा चिरला. दोघेही घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्यानंतर समुपदेशन सत्रात सहभागी होण्यासाठी याठिकाणी गेले होते. पत्नीवर हल्ला केल्यानंतर या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. महिलेला रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पत्नी नेता तर पती चोर; दरोड्याच्या पैशातून करायचा असं काम की, जाणून पोलीसही शॉक घटनेच्या काही मिनिटांपूर्वी, एका समुपदेशन सत्रात जोडप्याने त्यांच्यातील मतभेद विसरून नवीन सुरुवात करण्यासाठी आणि त्यांचे 7 वर्षांचे वैवाहिक जीवन वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं मान्य केलं होतं. मात्र, एका तासाच्या काउंसलिंगनंतर होलेनरसीपुराच्या कौटुंबिक न्यायालयातून बाहेर पडताच शिवकुमारने पत्नी चैत्रा हिच्यावर हल्ला केला. तो महिलेचा पाठलाग करून वॉशरूममध्ये गेला आणि तिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला. त्यामुळे महिलेचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. आरोपी पतीने गुन्हा केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला असता रस्त्याने जाणाऱ्यांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. चैत्राला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे तिला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. तिच्या घशात खोलवर जखमेमुळे रक्तस्त्राव झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोलिसांनी आरोपी पती शिवकुमारविरुद्ध पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकारी तपास करत आहेत की, तो व्यक्ती कोर्टाच्या आवारात धारदार शस्त्र घेऊन कसा गेला. VIDEO: 90 सेकंदात रिक्षाचालकाला 17 वेळा कानशिलात लगावल्या; महिलेची क्रूरता पाहून येईल संताप हसनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिराम शंकर म्हणाले, “ही घटना न्यायालयाच्या आवारात घडली. आरोपी आमच्या ताब्यात आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेले हत्यार आम्ही जप्त केले आहे. समुपदेशन सत्रानंतर काय झाले आणि तो न्यायालयात शस्त्र घेऊन जाण्यात कसा यशस्वी झाला याचा तपास करू. हा पूर्वनियोजित खून होता का, याचा तपास केल्यानंतरच तपशील मिळू शकेल."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







