लखनऊ 17 जानेवारी : पती आणि पत्नीचं नातं अतिशय खास असतं. मात्र, अनेकदा या नात्यात काहीतरी समस्याही येतात. काहीवेळा तर या गोष्टी अशा असतात, ज्याबद्दल ऐकूनच सगळे चकित होतात. आता असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशातून समोर आलं आहे. यात लखनऊमधील आशियाना पोलीस स्टेशन परिसरात एका व्यक्तीने पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पतीने आरोप केला आहे की त्याची पत्नी त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू मागते.
ओढणीवरील बोरकोडने उकललं त्या महिलेच्या पुण्यातील हत्येचं गूढ; 2 प्रियकरांनीच काढला काटा
मागणी पूर्ण न केल्यास पत्नी त्याचा मानसिक छळ करते, असंही पतीने तक्रारीत म्हटलं. मिळालेल्या माहितीनुसार, आशियाना येथील रहिवासी जितेंद्र सिंहने सांगितलं की, तो नेहमी पत्नी सोनमची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असे. मात्र आता तिची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तो नाराज आहे.
पीडित व्यक्तीने सांगितलं की, त्याची आणि सोनमची फेसबुकवर भेट झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यानंतर दोघंही आशियाना येथील रजनीकंद भागात जितेंद्रच्या घरी राहू लागले. पण काही काळानंतर सोनमने त्याला सांगितलं की ती तिच्या सासरच्यांसोबत राहू शकत नाही. पत्नीचा हट्ट पाहून त्याने दुसरं घर घेतलं. दोघेही मग तिथे राहू लागले.
विवाहित, 3 वर्षांचा मुलगा तरीही केली एक चूक; सुखी आयुष्याचं स्वप्न पाहणाऱ्या ममताचा धक्कादायक शेवट
तेव्हापासून सोनमने त्याच्याकडे महागड्या गिफ्ट्सची मागणी सुरू केली. सुरुवातीला त्याने पत्नीची मागणी पूर्ण केली. मात्र तिची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली. जितेंद्रने सांगितलं की, "माझी पत्नी सोनम कधी आलिशान कार घेण्यास सांगते तर कधी पैसे मागत राहते. माझ्या आईचं घर तिने तिच्या नावावर करायला सांगितल्यावर तर हद्द झाली. मी तिची मागणी पूर्ण न केल्याने तिने माझा मानसिक छळ सुरू केला. तिने मला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे. यामुळे मला नैराश्य आले आहे.'
व्यथित झालेल्या पतीने आशियाना पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, आशियाना पोलीस स्टेशनचे प्रभारी अजय प्रकाश मिश्रा यांनी सांगितलं की, पीडित व्यक्तीच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news, Wife and husband