मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बायकोनं मध्यरात्री पतीच्या प्रायव्हेट पार्टवर टाकले उकळतं पाणी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बायकोनं मध्यरात्री पतीच्या प्रायव्हेट पार्टवर टाकले उकळतं पाणी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

संतापलेल्या बायकोचं पतीसोबत भयंकर कृत्य, प्रायव्हेट पार्टवर ओतलं उकळतं पाणी, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही भयंकर घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

संतापलेल्या बायकोचं पतीसोबत भयंकर कृत्य, प्रायव्हेट पार्टवर ओतलं उकळतं पाणी, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही भयंकर घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

संतापलेल्या बायकोचं पतीसोबत भयंकर कृत्य, प्रायव्हेट पार्टवर ओतलं उकळतं पाणी, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही भयंकर घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

चेन्नई : पती पत्नीचं नातं हे प्रेमानं बांधलेलं असतं. संसाराचा हा गाडा ओढण्यासाठी दोघांची एकमेकांना साथ महत्त्वाची असते. मात्र या प्रेमात संशयाचं भूत वाईट असतं. हे एकदा डोक्यात गेलं की मग माणूस कोणत्याही थराला जातो. त्यातून बऱ्याचदा कलह किंवा नको त्या घटना घडतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयातून बायकोनं पतीच्या प्रायव्हेट पार्टवर मध्यरात्री उकळतं पाणी ओतलं.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही भयंकर घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. पती गाढ झोपेत असताना बायकोनं रागाच्या भरात उकळतं पाणी पतीच्या प्रायव्हेट पार्टवर टाकलं. या घटनेत पती गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्याची प्रकृती खालवल्याने दुसऱ्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

धक्कादायक! उसने पैसे मागितले म्हणून जिवंत जाळलं, शिक्षिकेचा मृत्यू

नेमकं काय प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार 29 वर्षीय प्रियाला आपला पतीवर संशय होता. त्याचे बाहेर इतर महिलांसोबत संबंध असल्याचा संशय तिला होता. या कारणावरून दोघांमध्ये कायम खटके देखील उडायचे. पत्नी नातं संपवण्यासाठी हट्ट धरून बसली. तिला अशा नात्यात राहायचं नव्हतं. मात्र पती तिला घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे याचा राग मनात ठेवून तिने टोकाचं पाऊल उचललं.

सोमवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतप पती झोपायला गेला. मध्यरात्री पत्नीने पतीला धडा शिकवण्याच्या रागातून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उकळतं पाणी ओतलं. पती वेदनेनं विव्हळत होता. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक काय घडलं हे पाहण्यासाठी जमा झाले. शेजाऱ्यांनी त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

VIDEO: आधी वाट पाहिली अन् समोर येताच झाडल्या गोळ्या; कोचिंगसाठी निघालेल्या मुलीवर रस्त्यातच भयानक हल्ला

या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. पोलिसांनी आरोपी पत्नीवर कलम- 294, कलम 324, कलम 506, कलम 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पत्नीवर पतीला दुखापत करणं आणि धमकीसाठी शिक्षा अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना तमिळनाडूमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे.

First published:
top videos

    Tags: Tamil nadu