जयपूर : उसने पैसे घेतले तर ते वेळेत परत करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा हे पैसे देण्यासाठी टाळाटाळ होते. त्यातून कलह निर्माण होतात आणि अनर्थ घडतो. जयपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. उसने पैसे मागितल्याची शिक्षिकेला भयंकर मोठी शिक्षा मिळाली. या शिक्षिकेच्या मदतीला कोणी आलं नाही. तर उपस्थितांनी बघ्याची भूमिका घेऊन व्हिडीओ काढले. 6 वर्षांच्या मुलासोबत शाळेत निघालेल्या शिक्षिकेला रस्त्यात जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली. मुलाच्या डोळ्यादेखत शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आलं.
भर वर्दळीच्या ठिकाणी 35 वर्षीय महिलेचा खून, गोंदियातील सुरक्षा रामभरोसे? हादरवणारी घटना
या महिलेनं एका व्यक्तीला 2 लाख 50 हजार रुपये उसने दिले होते. मात्र वारंवार सांगूनही तो पैसे देण्याचं नाव घेत नव्हता. शिक्षिकेनं त्याला वारंवार आठवण करून दिली. अखेर तिने न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. तिने सुनील नावाच्या या व्यक्तीला 2 लाख 50 हजार रुपये उसने दिले होते. मात्र तो पैसे परत करण्याचं नाव घेत नव्हता. त्यामुळे तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांकडूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप पतीने केला.
चित्रपटालाही लाजवेल इतका भयानक घटनाक्रम, प्रसिद्ध व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं? सांगली जिल्हा हादरला
या सगळ्याचा राग मनात ठेवून सुनीलने शिक्षिकेला शाळेत जाताना गाठलं. त्याने बदला घेण्यासाठी या महिलेला जिवंत जाळलं. यामध्ये 70 टक्के शिक्षिका भाजली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे असलेले लोक बघ्याची भूमिका घेत होते.
Woman set on fire by miscreants over lending dispute in Jaipur, succumbs to burn injuries. Here's what the victim said in her statement before passing away #Rajasthan #CrimeNews | @aayeshavarma pic.twitter.com/Ftx0SyFvxy
— News18 (@CNNnews18) August 18, 2022
त्यांनी व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र मदतीला कोणी पुढे आलं नाही. रुग्णालयात दाखल करण्यासाठी उशीर झाला. शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.