पाटणा 18 ऑगस्ट : दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे गुन्हेगारांमधील भीती पूर्णपणे नष्ट झाली की काय? असा प्रश्न अनेक घटनांमुळे उपस्थित होतो. सध्या याचाच प्रत्यय देणारा एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात भररस्त्यावरच एका मुलीवर गोळीबार केल्याचं पाहायला मिळतं. धक्कादायक! उसने पैसे मागितले म्हणून जिवंत जाळलं, शिक्षिकेचा मृत्यू ही घटना बिहारमधील आहे. पाटणा येथील बायपास परिसरात कोचिंगसाठी निघालेल्या मुलीवर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या आणि तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचं फुटेज आता समोर आलं आहे. ही घटना बुधवारी 17 ऑगस्ट रोजी घडली आहे.
पाटणा : कोचिंगसाठी निघालेल्या मुलीवर रस्त्यावरच गोळीबार, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/fzHKsG4Z6U
— News18Lokmat (@News18lokmat) August 18, 2022
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हा व्यक्ती रस्त्यावर उभा राहून मुलीची वाट पाहत परिसरात फिरत आहे. काही वेळानंतर ही मुलगी तिथे पोहोचते. ती या व्यक्तीकडे न पाहता रस्ता ओलांडून पुढे चालू लागते. इतक्यात आरोपी तिचा पाठलाग करतो आणि तिच्यावर गोळ्या झाडतो. क्षणभरातच मुलगी खाली कोसळते. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळ काढतो. थरकाप उडवणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आसपासच्या लोकांच्या ही बाब लक्षात येण्याआधीच आरोपी तिथून फरार होतो. शिक्षक झाला भक्षक! प्रॅक्टिकलच्या नावाखाली 20 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार, पीडितेचा टोकाचा निर्णय आता समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेत या मुलीच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून तिला काल एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, प्रकृती गंभीर आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी सध्या व्हेंटिलेटरवर आहे.