तिरुवनंतपुरम, 22 मार्च: पत्नीने नाष्टा बनवायला उशीर केला (wife take more time for make breakfast) म्हणून तिला थेट जीवे मारल्याची (Murder) एक भयानक घटना समोर आली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बेदम मारहाणीत जखमी (Injury) झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातचं तिचा मृत्यू (Death) झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. आरोपी पतीचं नाव सोमादास असून तो एक शेतमजूर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही केरळमधील कोल्लम या ठिकाणी घडली असून संबंधित जोडपं तिरुवनंतपुरम येथील मुळ रहिवासी आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते मावडी याठिकाणी शेतमजूर म्हणून काम करत होते. घटनेच्या दिवशी सोमदास कामावरुन घरी परतला होता. यावेळी त्याने आपली पत्नी सुशीलाला तातडीने नाष्टा बनवण्यास सांगितलं, पण सुशीलाला नाष्टा करायला थोडा उशीर झाला आणि त्यावरुनच पती पत्नीमध्ये वादाला सुरुवात झाली. यामुळे संतापलेल्या पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपी पतीच्या हल्ल्यात पत्नीला गंभीर दुखापत झाली.
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. पीडित पत्नीचा रुग्णालयात उपचरापूर्वीचं मृत्यू झाला आहे. या दाम्पत्याला मुलं नाहीत. या घटनेनंतर जेव्हा पोलिसांनी जवळच्या लोकांकडे चौकशी केली, तेव्हा पोलिसांना या घटनेमागील धक्कादायक कारण समजलं. पोलीस अधिकारी म्हणाले की, नाष्टा करायला उशीर झाल्यामुळे पती-पत्नीत भांडण झालं. त्यानंतर हा वाद वाढून याचं रुपांतर हिंसेत झालं. त्यातच आरोपी पतीनं आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली.
(वाचा -एक रोपटं उपटल्याची एवढी मोठी शिक्षा! बारा वर्षीय मुलीला रॉकेल ओतून जाळलं)
पोलिसांनी पुढं सांगितलं की, यापूर्वीही या जोडप्यामध्ये भांडणं झाली होती. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पत्नीच्या शरिरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली होती. तिला रुग्णालयात उपचार करण्याची घेऊन गेलं असता, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Death, Food, Kerala, Murder, Shocking news, The woman, Wife and husband