इंदौर 10 नोव्हेंबर : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदौरमधील खजराना ठाण्याच्या क्षेत्रातील 45 वर्षीय महिला काही दिवसांपूर्वीच आपल्या प्रियकरासोबत घरातील 47 लाख रूपये घेऊन पळून गेली होती (Crorepati's Wife Flees With Autorickshaw Driver). ही महिला सोमवारी रात्री उशिरा घरी परतली. महिलेनं खजराना ठाण्यात जात जबाब नोंदवला.
महिलेचं असं म्हणणं होतं की तिला आपल्या पतीसोबत राहायचं आहे. तर महिलेच्या पतीनंही आपल्याला आपल्या पत्नीसोबत राहायचं असल्याचं सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणात 34 लाख रूपये आधीच जप्त केले असून महिलेचा प्रियकर असलेला रिक्षा चालक सध्या फरार आहे.
क्रूरतेचा कळस! सळईने मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यू,पुण्यातील मन हेलावणारी घटना
खजराना ठाण्याचे सीएसपी जयंत राठोड यांनी सांगितलं, की 13 ऑक्टोबरला खजराना परिसरातील प्रॉपर्टी ब्रोकरची पत्नी आपल्यापेक्षा 13 वर्ष लहान असलेल्या रिक्षाचालकासोबत पळून गेली. तिनं घरातील 47 लाख रुपयेही लंपास केले. प्रॉपर्टी ब्रोकर करोडपती असल्याचं समोर आलं आहे. आरोपीनं 34 लाख रुपये आपल्या दोन मित्रांना दिले होते. रिक्षाचालकाचे मित्र रितेश ठाकूर आणि फुरफान याच्याकडून पोलिसांनी हे पैसे आधीच जप्त केले होते. पोलिसांनी महिला आणि रिक्षा चालकाला अटक करण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारी केली मात्र दोघंही पोलिसांना सापडले नाहीत. सोमवारी रात्री उशिरा महिला स्वतःच ठाण्यात पोहोचली.
अनेक तास पोलिसांनी महिलेची चौकशी केली. महिलेनं सांगितलं, की ती घरातून पैसे घेऊन घरातून निघाली आणि एक स्विफ्ट डिझायर टॅक्सीनं आपल्या प्रियकरासोबत आधी पीथमपूर येथे गेली. यानंतर ते दोघंही जावरा, शिर्डी, लोणावळा, खंडाळा, नाशिक, वडोदरा, सूरत अशा अनेक ठिकाणी फिरले. त्यांच्याकडील पैसे संपत आले होते. यानंतर जवळपास एका महिन्याने ती घरी परतली.
अर्ध्यावरच मोडला संसार; पत्नी माहेरी गेल्याच्या विरहातून तरुणाचं टोकाचं पाऊल
महिलेचा प्रियकर तिच्यापेक्षा १३ वर्ष लहान होता. तरीही प्रेमात पडलेली महिला रिक्षाचालकासोबत पळून गेली. महिलेनं पोलिसांना सांगितलं, की तिचा पती तिला त्रास देत असे. यामुळे ती घरातून फरार झाली. मात्र आता तिला आपल्या पतीसोबतच राहायचं आहे. पतीलादेखील आपल्या पत्नीसोबत राहायचं आहे. महिलेकडील पैसे संपले असून ती दागिने परत घेऊन आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news