सीकर, 03 जून : पतीनं धोका दिल्याच्या संशयातून गर्भवती पत्नीनं आपल्या पतीलाच संपवल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील सीकरमध्ये घडली. पतीवर आरोपी महिलेचा संशय होता आणि त्यातून कुऱ्हाडीनं सपासप वार करत हत्या केली. पतीचा मृतदेह जमीनीमध्ये दफन करून तिने स्वत: ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. धोद पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भैरंपुरा गावातील हा धक्कादायक प्रकार आहे. सोमवारी पहाटे 3 च्या सुमारास आरोपी गर्भवती महिलेनं आपल्या पतीला संशयातून संपवलं आणि मृतदेहाची विल्हेवाट लावून तिने सरेंडर केलं. आरोपी महिलेनं आपल्या पतीची हत्या कशी आणि का केली याचा कबुली जबाबद दिला आहे. हे वाचा- महिला पोलिसाची छेड काढल्याची भयानक शिक्षा, झाडाला हात-पाय बांधून जिवंत जाळलं पोलिसांच्या प्राथमिक तापसणीमध्ये धक्कादायक बाब समोर आली. 20 दिवसांपूर्वी मेव्हणी तिच्या घरी आली होती. प्रसूतीची वेळ जवळ आल्यानं मेव्हणीला घरी बोलवलं होतं. त्याच दरम्यानं पतीचे आपल्या बहिणीशी अवैध संबंध असल्याचा संशय या आरोपी महिलेला आला. या संशायातून आरोपी महिलेनं पतीवर कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या ही आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार आहे. हे वाचा- अरेरे! Love Marriage होऊन फक्त 5 दिवसच झाले, त्या दोघांनीही संपवलं आयुष्य हे वाचा- चुलत भावावर जडला जीव, पत्नीने मास्टर माईंड बनून पतीचा केला मर्डर संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







