शाहजहांपूर (उत्तर प्रदेश), 01 मे : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन असलं तरी गुन्ह्यांच्या घटना काही कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. असाच एक हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाहजहांपूर जिल्ह्यातील निगोही पोलीस स्टेशन परिसरातील सहतपुर गावात महिलेने आपल्या प्रियकरासह तिच्या पतीचा गळा आवळून खून केला. माहिती मिळताच मृताचा भाऊ घरी परतला. वहिनी व त्याचा भाऊ यांच्यावर खुनाचा आरोप आहे. पोलिसांनी मृताच्या भावाच्या वतीने त्याचा मेहुण्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसंच महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. राजवीर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो 26 वर्षांचा होता. चार वर्षांपूर्वी राजवीरचे शहरातील कोतवाली चौक परिसरातील अब्दुल्लागंज मोहल्ला इथल्या अंजलीशी लग्न झालं होतं. या जोडप्याला मुलबाळ नव्हतं. महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे चक्रीवादळ, हवामान खात्याने फोटो केला प्रसिद्ध राजवीर हरियाणाच्या बहादूरगड इथल्या एका बूट कंपनीत काम करायचा. राजवीर हा पत्नी अंजली आणि तिचा चुलतभाऊ बबलू यांच्यासमवेत निवारी खेड्यातील रहिवासी होता. कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली आणि तिचा भाऊ बबलू यांच्यात प्रेमसंबंध होते. भाऊ राजवीरलाही याबाबत शंका होती. यावर त्याने अंजलीला समजही दिली होती. महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे चक्रीवादळ, हवामान खात्याने फोटो केला प्रसिद्ध बबलू आणि अंजलने प्रेमसंबंधाच्या मधे येणाऱ्या राजवीरचा काटा काढण्याचं ठरवलं. त्याला घरात एकटं गाठून त्याचा गळा आवळून ठार केलं. गावातील लोकांना घटनेची माहिती मिळाली. भाऊचा मृतदेह व्हरांड्यात पडलेला आढळला. एसपी सिटी दिनेश त्रिपाठी आणि सीओ सदर कुलदीपसिंग गुणवत घटनास्थळी दाखल झाले. ते म्हणाले की, लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल. महाराष्ट्रावर आणखी एक संकट, या राज्यांना 3 जूनपर्यंत दिला सतर्कतेचा इशारा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








