सोनिपत 1 जून: हरियाणातल्या सोनिपत जिल्ह्यातल्या मयूर विहारमधल्या एका घटनेने अख्ख गाव हादरून गेलं आहे. एका जोडप्याने प्रेम विवाहाच्या पाच दिवसानंतरच त्या नवपरिणीत जोडप्याने आत्महत्या केली. या आत्महत्येचं गुढ अजुन उकलेलं नसून त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस घटनेचा तपास करत असून पोलीस आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मनजित आणि आरती यांनी 27 मे रोजी लव्ह मॅरेज केलं होतं. घरच्या मंडळींच्या अनुमतीनंतर त्यांनी प्रेमविवाह केला होता. सगळं कुटुंब आनंदात होतं. मात्र पाच दिवसात त्यांचा आनंद संपून गेला. आरतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमती मनजितला कळताच त्याने रेल्वे समोर उडी घेत आपलंही जीवन संपवलं. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबीयांना त्या दोघांच्या अंत्यसंस्काराची तयारी करावी लागली. त्या दोघांमध्ये भांडणं नव्हती अशी माहिती कुटुंबीयांनी दिलीय. या दोघांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं ते कोडं त्यांचे कुटुंबीय आणि शेजारच्या लोकांना आहे. पोस्टमार्टेम नंतर कुटुंबीयांना दोघांचंही पार्थिव सोपविण्यात आलं होतं. या घटनेने दोघांच्याही आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. हेही वाचा - वडिलांनीच गळा आवळून केली तरुण मुलाची हत्या, खळबळजनक घटना कपडे असो वा कोणतीही वस्तू ‘या’ कपाटात ठेवताच व्हायरसमुक्त होणार म्हशीसोबत पंगा सिंहाला पडला भारी, असं काय घडलं? एकदा पाहाच हा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







