हैदराबाद 31 मे : एक अतिशय धक्कादायक प्रकरण हैदराबादमधून समोर आलं आहे. यात एका महिलेनं प्रेमसंबंधाच्या संशयातून आपल्या पतीच्या मैत्रिणीचाच बलात्कार करवून घेतला (Wife Hired Goons to Rape Hubby’s Friend). महिलेला संशय होता की तिच्या पतीचं त्याच्या मैत्रिणीसोबत अफेअर आहे. इतकंच नाही तर महिलेनं बलात्काराचा व्हिडिओही शूट केला. हे प्रकरण सायबराबादमधील गचीबोवली येथील आहे. तो बेशुद्ध पडला होता अन् मित्र लाकडी दांड्याने मारत होता, अंगावर शहारे आणणारा VIDEO इथे एका महिलेने दुसऱ्या महिलेवर बलात्कार करण्यासाठी 5 लोकांना हायर केलं. जेणेकरून ती त्या महिलेवर बलात्कार करवून घेऊ शकेल, जिचे आपल्या पतीसोबत प्रेमसंबंध असल्याचा तिला संशय होता. पोलिसांनी आरोपी महिला गायत्रीसह 6 जणांना अटक केली आहे. कोंडापूर येथील गायत्रीच्या घरात ५ जणांनी महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्रीचा पती श्रीकांत पीडितेला यूपीएससीच्या तयारीदरम्यान कोचिंगमध्ये भेटला होता. पीडिता अनेकदा गायत्रीच्या पतीला भेटण्यासाठी गायत्रीच्या घरी येत असे. यानंतर ती ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत गायत्रीसोबत तिच्याच घरी राहिली. पुढे गायत्रीला संशय आला की तिच्या पतीचे महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. बराच वाद झाल्यानंतर महिलेनं गायत्रीचं घर सोडलं. “जगण्यापेक्षा मरण बरं”, Whatsapp Status ठेवत तीन सख्ख्या बहिणींची आत्महत्या आरोप आहे की, 26 मे रोजी गायत्रीने पीडितेला तिच्या घरी बोलावलं. इथे गायत्रीने आधीच पैसे देऊन लोकांना बोलावून घेतलं होतं. यानंतर पीडितेवर बलात्कार करण्यात आला. त्याचा व्हिडिओही बनवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसात गेल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन पीडितेला सोडून देण्यात आलं. दुसरीकडे पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.