• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • महिलेनं पतीला मारण्यासाठी रचला कट; प्रोटीन पाउडरमधून द्यायची विष, अखेर असा झाला खुलासा

महिलेनं पतीला मारण्यासाठी रचला कट; प्रोटीन पाउडरमधून द्यायची विष, अखेर असा झाला खुलासा

एका व्यक्तीला याची कल्पनाही नव्हती की त्याच्या पत्नीच्या मनात त्याच्याबद्दल किती राग आहे. पत्नीनं या व्यक्तीचा जीव घेण्याचा कटही रचला होता.

 • Share this:
  नवी दिल्ली 21 सप्टेंबर : पती आणि पत्नी यांच्या नात्यात वाद (Dispute Between Husband and Wife) सुरुच असतात. मात्र, तरीही त्यांच्यातील प्रेम (Love) कायम राहातं. मात्र, हा वाद कोणत्या थरारा गेला आहे, हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. दोघांच्यातील एकाच्याही मनात कटुता आणि राग भरला असेल तर मग हे नातं टिकून राहणं अतिशय कठीण होऊन जातं. अनेकदा हा वाद अगदी टोकाला जातो आणि सगळंच हाताबाहेर जातं. अशा घटनांमध्ये पती पत्नीनं एकमेकांचे जीव घेतल्याचेही अनेक प्रकार समोर येतात. काहीशी अशीच घटना आता समोर आली आहे. यात अमेरिकेतील (America) एका व्यक्तीला याची कल्पनाही नव्हती की त्याच्या पत्नीच्या मनात त्याच्याबद्दल किती राग आहे. पत्नीनं या व्यक्तीचा जीव घेण्याचा कटही रचला होता. अमेरिकेत राहणाऱ्या या कपलला पाहून कोणालाही असंच वाटायचं की हे दोघंही किती आनंदी आहेत. लग्नानंतर 17 वर्ष दोघांनीही एकत्र घालवले. पत्नी आपल्या पतीची भरपूर काळजी घ्यायची. पती जिमवरुन आल्यावर ती स्वतः त्याला प्रोटीन शेक बनवून द्यायची. मात्र, पतीला याची कल्पनाही नव्हती की या शेकमुळे त्याच्या आरोग्यावर चांगला नाही तर विपरित परिणाम होत आहे. महिला या शेकमध्ये आर्सेनिक (Aarsenic) नावाचं विष मिसळून देत असे. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा आपल्या वजनात भरपूर घट झाल्याचं या व्यक्तीच्या लक्षात आलं. कारमधून बाहेर आलं अस्वल अन्...; VIDEO मध्ये पाहा कशी झाली महिलेची अवस्था डेली स्टारच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनामध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय जेडी मॅककेबे याला त्याची पत्नी मागील बऱ्याच काळापासून विष देत होती. जेडीचं लग्न पत्नी एरिन हिच्यासोबत १७ वर्षांपूर्वी झालं होतं. दोघांनी दोन मुलंही आहेत. या जोडप्याचं आयुष्य अगदी आनंदात चाललं होतं. यादरम्यान अचानक जेडीला प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. पोटात दुखणं आणि वजन झपाट्यानं कमी होणं अशा समस्याही त्याला जाणवू लागल्या. जेव्हा त्यानं याच कारण शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा डॉक्टरांनी धक्कादायक खुलासा केला. एरिन बऱ्याच दिवसांपासून जेडीला प्रोटीन पावडरमध्ये आर्सेनिक विष मिसळून देत होती. जेडीला याची भनकही नव्हती. यामुळे काही दिवसांनंतर त्याच्या शरीराच्या काही भागांवर सूज येऊन त्याला वेदनाही होऊ लागल्या होत्या. सोबतच त्याचं वजनही इतकं कमी झालं की लोक त्याला कॅन्सर रुग्ण समजू लागले. यादरम्यान एरिनच्या वागण्यातही बदल झाला. तिनं जेडीवर आपल्याला धोका दिल्याचा आणि ड्रग्ज तसंच दारूमुळे तो मानसिक रुग्ण झाल्याचा आरोप केला. तिनं जेडीकडून घटस्फोटही घेतला. यानंतर जेडीनं स्वतःच चेकअप करून घेतलं. टेस्टचा रिपोर्ट समोर येताच जेडीनं एरिनवर आपल्याला विष दिल्याचा आरोप केला. पाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video रिपोर्टच्या आधारे जेडीनं यासाठी एरिनच जबाबदार असल्याचं म्हटलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वेळेतच याबाबत माहिती झाल्यानं जेडीचा जीव वाचू शकला. आर्सेनिकचा थोडासा अंशही माणसाच्या जिवासाठी अत्यंत धोकादायक आहे. मात्र, हे प्रोटीन पावडरसोबत दिलं गेल्या शरीरावर याचे परिणाम हळूहळू जाणवू लागतात. जेडीसोबतही हेच घडलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: