मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

शेती विकून पत्नीच्या खात्यात जमा केले 39 लाख; अकाऊंटमध्ये 11 रुपये ठेवून महिला प्रियकरासोबत फरार

शेती विकून पत्नीच्या खात्यात जमा केले 39 लाख; अकाऊंटमध्ये 11 रुपये ठेवून महिला प्रियकरासोबत फरार

ही स्टेज फर्स्ट बायोलॉजिकल रिस्पॉन्स नंतर सुरु होते. त्याच्या जोडीने काही हॉर्मोनल रिस्पॉन्स ट्रिगर होतात. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं शरीरातल्या स्ट्रेस रिस्पॉन्समुळे होतं.

ही स्टेज फर्स्ट बायोलॉजिकल रिस्पॉन्स नंतर सुरु होते. त्याच्या जोडीने काही हॉर्मोनल रिस्पॉन्स ट्रिगर होतात. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं शरीरातल्या स्ट्रेस रिस्पॉन्समुळे होतं.

पतीनं गावातील आपली शेती विकली. शेतीचे जे पैसे मिळाले ते सगळे पैसे त्यानं आपल्या पत्नीच्या खात्यात (Bank Account) जमा केले. मात्र, पत्नी असं काही करेल याची त्याला कल्पनाही नव्हती

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 29 ऑगस्ट : लग्नाच्या (Marriage) आधी एकमेकांसाठी एकदम अनोळखी असलेली मुलगी आणि मुलगी सात फेरे घेऊन एकमेकांसोबत नात तयार करतात. इथूनच एका विश्वासाच्या नात्याला सुरुवात होते. मात्र, दोघांच्यातील एकाचाही विश्वासघात झाला की पती आणि पत्नीचं (Husband and Wife) हे नातं खराब होतं. बिहारमधून (Bihar) असंच एक प्रकरण समोर आलं आहे. यात एका महिलेचं 14 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.

लग्नानंतर दोघांनीही आनंदात आपलं आयुष्य जगायला सुरुवात केली होती. त्यांनी सोबत मिळून एक स्वप्नही पाहिलं होतं. त्यांना शहरात आपलं घर घ्यायचं होतं. पतीनं यासाठी गावातील आपली शेती विकली. शेतीचे जे पैसे मिळाले ते सगळे पैसे त्यानं आपल्या पत्नीच्या खात्यात (Bank Account) जमा केले. मात्र, पत्नी असं काही करेल याची त्याला कल्पनाही नव्हती. पती कामासाठी दुसऱ्या राज्यात गेला आणि याचदरम्यान त्याची पत्नी आपल्या शेजाऱ्यासोबत फरार झाली. इतकंच नाही तर पतीनं तिच्या खात्यात जे 39 लाख रुपये जमा केले होते तेदेखील घेऊन ती पसार झाली. खात्यात तिनं केवळ 11 रुपये ठेवले. या घटनेची माहिती जेव्हा पतीला मिळाली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

'हॅलो, ED ऑफिसमधून बोलतोय', करोडो रुपये उकळणाऱ्या 'गोडसे' फिल्मच्या नायकाला अटक

ही घटना बिहारच्या पाटणामधील आहे. यात 14 वर्षाआधी बिहटाच्या कौड़िया येथे राहणाऱ्या ब्रजकिशोर सिंह याने भोजपुरच्या बिंद गावातील प्रभावतीसोबत लग्न केलं. ब्रजकिशोर गावातच शेती करायचा. बिहटा येथे एका भाड्याच्या घरात राहून तो शेती करत असे. मात्र, यादरम्यान त्यानं शेती करणं सोडलं आणि पैसे कमवण्यासाठी तो गुजरातला गेला.

गुजरातमध्ये काम करून तो आपल्या पत्नीच्या खात्यात पैसे पाठवत असे, यातूनच त्याचं कुटुंब चालत होतं. याच काळात त्याच्या पत्नीची शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत जवळीक वाढली. हळूहळू दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. दररोज दोघांची बातचीत होत असे. पतीला याबाबत काहीही कल्पना नव्हती. या काळात दोघांनी शारीरिक संबंधही ठेवले. याची कोणालाही भनकही नव्हती. ब्रजकिशोरचा एक मुलगा आणि मुलगीही होती.

बायको माहेरी जाताच मुख्याध्यापकानं केला कांड; धक्कादायक घटनेनंतर गुन्हा दाखल

मुलगा आणि मुलीचा चांगला सांभाळ करावा यासाठी ब्रिजकिशोरनं शहरात राहण्याचा निर्णय घेतला. शहरात राहण्यासाठी पैशाची गरज होती. यासाठी त्यानं गावातील शेती विकली. यातून आलेले 39 लाख रूपये त्यानं आपल्या पत्नीच्या खात्यात जमा केले. मात्र, आपली पत्नी आपल्याला धोका देऊन इतर कोणासोबत जात आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती. जमिन विकून तो पुन्हा आपल्या कामासाठी गुजरातला गेला. तिथून तो घरी परतला तेव्हा घराला कुलूप होतं. त्यानं घरमालकाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की तुझी पत्नी आपल्या मुलीला घेऊन कुठेतरी निघून गेली आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याला आपला मुलगा सापडला. नंतर त्यानं जेव्हा बँक खातं तपासलं तेव्हा समजलं की खात्यात केवळ ११ रुपये शिल्लक आहेत.

यानंतर ब्रजकिशोर थेट ठाण्यात पोहोचला आणि त्यानं पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिची दिली. तपासात पोलिसांना हे समजलं, की प्रभावतीचे एका पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध होते. प्रभावतीनं 26 लाख रुपये डेहरी येथील एका व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचं आढळलं तर बाकी 13 लाख चेकच्या माध्यमातून काढले गेले. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Viral news, Wife and husband