सोलापूर, 29 ऑगस्ट: मुख्याध्यापक हा आपल्या शाळेला आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम करत असतो. पण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील एका मुख्याध्यापकनं धक्कादायक कृत्य करत समाजासमोर एक वाईट आदर्श ठेवला आहे. आरोपी मुख्याध्यापकानं आपल्या पत्नीचा छळ करत तिच्या परस्पर दुसरा संसार थाटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं आरोपी मुख्याध्यापकासह कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता बापू अडसूळ असं फिर्यादी महिलेचं नाव असून 2012 साली त्यांचा विवाह अंकोली येथील बापू अडसूळ यांच्यासोबत झाला होता. आरोपी बापू अडसूळ हे सध्या म्हैसगाव येथील मातोश्री विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. हे महाविद्यालय विनाअनुदानित असल्यानं त्यांना पगार मिळत नव्हता. त्यामुळे त्यांना कॉम्पुटरचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी आरोपीनं फिर्यादी महिलेचा छळ केला आहे. आरोपी फिर्यादीकडे माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. हेही वाचा- Gang Rape च्या घटनेनं पुणे हादरलं; 25 वर्षीय तरुणीसोबत चौघांचं घृणास्पद कृत्य आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी महिला माहेरी निघून गेली होती. दरम्यान आरोपीनं बायकोच्या परस्पर दुसरं लग्न केलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी फिर्यादी महिलेच्या वडिलांनी आरोपीला एकदा एक लाख रुपये आणि दुसऱ्यांदा तीन लाख रुपये दिले होते. तरीही फिर्यादीला आरोपी मुख्याध्यापकासह त्याच्या कुटुंबीयांकडून त्रास सुरू होता. या त्रासाला कंटाळून फिर्यादी महिला आपल्या माहेरी गेली होती. दरम्यान आरोपीनं दुसरं लग्न केलं आहे. हेही वाचा- रक्षाबंधनासाठी बायकोला माहेरी घेऊन गेला अन् परतलाच नाही; जुन्या BF ने काढला काटा याप्रकरणी फिर्यादी योगिता अडसूळ यांना आरोपी पती बापू अडसूळसह घरातील सात जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. कुर्डूवाडी पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक कायद्यासह, कौटुंबीक हिंसाचार अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास कुर्डूवाडी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.