• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'हॅलो, ED कार्यालयातून बोलतोय', करोडो रुपये उकळणाऱ्या 'गोडसे' फिल्मच्या नायकाला क्राइम ब्रॅन्चकडून अटक

'हॅलो, ED कार्यालयातून बोलतोय', करोडो रुपये उकळणाऱ्या 'गोडसे' फिल्मच्या नायकाला क्राइम ब्रॅन्चकडून अटक

फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव डॉ. संतोष राय उर्फ ​​राजीव सिंह आहे.

फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव डॉ. संतोष राय उर्फ ​​राजीव सिंह आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा ED अर्थातच अंमलबजावणी संचालनालयाच्या नावाखाली उद्योजक आणि व्यावसायिकांकडून करोडो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 ऑगस्ट: केंद्रीय तपास यंत्रणा ED अर्थातच अंमलबजावणी संचालनालयाच्या नावाखाली उद्योजक आणि व्यावसायिकांकडून करोडो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस आणि ED ने संयुक्त कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. संबंधित आरोपी ED च्या नावानं नोटीस पाठवून अनेकांना लुबाडत होते. तसेच गैरमार्गानं मिळवलेला हा पैसा चित्रपट बनवण्यासाठी वापरत असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा EDच्या नावानं फसवणूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि ईडीनं ही संयुक्त कारवाई केली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं तीन आरोपींना अटक केली. संबंधित आरोपी ईडीच्या नावानं शहरातील बड्या उद्योजक आणि व्यावसायिकांना नोटीस पाठवायचे. तसेच चौकशीसाठी बोलावण्याच्या नावाखाली बेकायदेशीर पैसे उकळत होते. हेही वाचा-'विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, म्हणून...'; मंत्र्याचा VIDEO VIRAL संबंधित आरोपींनी अनेक व्यावसायिकांकडून लाखो आणि करोडो रुपये उकळले असल्याचंही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच बेकायदेशीरपणे मिळवलेल्या या पैशाचा वापर चित्रपट निर्मितीसाठी करण्यात येत असल्याची माहितीही उघड झाली आहे. फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव डॉ. संतोष राय उर्फ ​​राजीव सिंह आहे. आरोपी राय हा 'गोडसे' नावाच्या चित्रपटात मुख्य अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक  आणि निर्माता देखील आहे. हेही वाचा-एक चापट अन् 7 सेकंदात 7 लाखांवर मारला डल्ला; लुटीचा थरारक VIDEO आला समोर संबंधित आरोपीनं शहरातील बड्या उद्योजक आणि व्यावसायिकाना मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे फोन करत आपण ईडीचे अधिकारी असल्याचं सांगत. तसेच ईडी मुख्यालयाच्या लँडलाईन क्रमांकाशी मिळत्या जुळत्या नंबरवरून व्यावसायिकांना धमकी देण्यात येत होती. अशा पद्धतीनं आरोपीनं अनेक व्यावसायिकांना करोडो रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: