Home /News /crime /

तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधण्याची 57 वर्षाच्या पतीची होती इच्छा; पत्नीनं झोपेतच गुप्तांग कापलं अन्...

तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधण्याची 57 वर्षाच्या पतीची होती इच्छा; पत्नीनं झोपेतच गुप्तांग कापलं अन्...

हजरा नावाच्या पत्नीने तिसऱ्या लग्नाला विरोध केल्यानं मौलवीनं आपल्या पत्नीला मारहाण केली. यानंतर मौलवी रात्री झोपेत असताना संतप्त पत्नीने त्याच्या गुप्तांगावर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला (Wife Cut off Genitals of Husband) केला.

    लखनऊ 26 जून : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मुझफ्फर नगरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तिसऱ्यांदा लग्न (Marriage) करण्याची इच्छा असल्यामुळे जिल्ह्यातील एका मौलवीला त्याच्या दोन पत्नींपैकी एकीने जिवे मारल्याचं उघड झालं आहे. जास्त रक्तस्त्रावामुळे मौलवीचा मृत्यू झाला. तिसर्‍या विवाहाच्या मुद्द्यावरुन मौलवी सतत आपल्या दोन पत्नींशी भांडण करीत असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गुरूवारीही रात्री उशिरा याच प्रकरणावरुन 57 वर्षीय मौलवी अहमदने आपल्या दोन पत्नींसोबत वाद घातला. यादरम्यान दोन्हीमधील हजरा नावाच्या पत्नीने त्याला विरोध केल्यानं मौलवीनं आपल्या पत्नीला मारहाण केली. यानंतर मौलवी रात्री झोपेत असताना संतप्त पत्नीने त्याच्या गुप्तांगावर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला (Wife Cut off Genitals of Husband) केला. कोयता घेऊन फेसबुकवर केली हवा; सोशल मीडिया डॉनला पोलिसांनी ढसाढसा रडवलं याच हल्ल्यात मौलवीचा मृत्यू झाला. यानंतर महिलेनं आपल्या नातेवाईकांच्या मदतीनं त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजाऱ्यांनी शंका आल्यानं त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. हजरानं पोलिसांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली, यानंतर पोलिसांनी तिला अटक केलं. लिंकद्वारे ऑनलाइन क्लासमध्ये घुसून मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ; भाईंदरमधील घटना पोलिसांनी सांगितलं, की आरोपीच्या पत्नीनं आपला गुन्हा मान्य केला आहे. महिलेच्या पतीला तिसरं लग्न करायचं होतं, त्यामुळे तिनं आपल्या पतीची हत्या केली. आधीच्या दोन पत्नींमध्ये आधीपासून बरेच वाद आणि अडचणी होत्या. मौलवी अहमद याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी महिलेला कोर्टात हजर करुन जेलमध्ये पाठण्यात आलं आहे. ही घटना मुजफ्फरनगरच्या भौरा कला ठाणा क्षेत्रातील शिकारपूर गावातील आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या