भाईंदर, 26 जून: कोरोना विषाणूचा उद्भाव
(Corona pandemic) झाल्यापासून जगभरातील शिक्षण क्षेत्र
(Education sector) पूर्णपणे कोलमडून गेले आहे. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून देशात अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा
(Online Education) अवलंब केला आहे. दरम्यान एका युवकानं लिंकद्वारे ऑनलाइन क्लासमध्ये
(Online class) घुसखोरी करत एका अल्पवयीन मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ
(Abuse) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल
(FIR lodged) केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
संबंधित घटना मीरा रोड याठिकाणी घडला घडली आहे. आरोपीनं चालू ऑनलाइन क्लासमध्ये घुसखोरी करत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची छळवणूक केली आहे. सर्वांसमोर तिला लज्जास्पद वाटेल, अशा शब्दांत आरोपीनं शिवीगाळ केली आहे. या घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना मिळाताच, त्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत देखील अशाच प्रकारची घटना घडली होती.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मीरा रोड येथील जीसीसी शाळेचे ऑनलाइन पद्धतीनं वर्ग भरवले जात आहेत. यासाठी 'गुगल क्लासरुम' प्रणालीचा वापर केला जात आहे. त्यासाठी ऑनलाइन क्लासची लिंक क्रिएट करून ती संबंधित विद्यार्थ्यांना पाठवण्यात येत आहे. मात्र या लिंकचा गैरवापर करत एका अज्ञात युवकानं या क्लासमध्ये घुसखोरी केली आहे. यानंतर आरोपीनं चालू वर्गात एका तेरा वर्षीय मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे.
हेही वाचा-शिक्षणासाठी मावशीकडे आली अन् घडलं विपरीत; मामा आणि काकानंच केले 7 महिने अत्याचार
या संतापजनक घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार विविध कलमांतर्गत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. संबंधित क्लासमधील विद्यार्थ्यांशी संबंधित कोणीतरी आरोपी असू शकतो, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.