मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /तृणमूल नेत्याच्या पत्नीसोबत भाजप नेत्याचं गैरकृत्य; पोलिसांनी घराचं दार तोडून आवळल्या मुसक्या

तृणमूल नेत्याच्या पत्नीसोबत भाजप नेत्याचं गैरकृत्य; पोलिसांनी घराचं दार तोडून आवळल्या मुसक्या

भाजपच्या एका नेत्यानं तृणमूलच्या एका नेत्याच्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप (BJP Leader Arrested for Allegedly Molesting TMC Leader's Wife) आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या नेत्याला अटक केली आहे.

कोलकाता 14 ऑगस्ट : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील वाद अनेकदा समोर येतात. त्यामुळे यात काही नवीन नाही. मात्र, आता समोर आलेली एक घटना ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. या घटनेत भाजपच्या एका नेत्यानं तृणमूलच्या एका नेत्याच्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप (BJP Leader Arrested for Allegedly Molesting TMC Leader's Wife) आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या नेत्याला अटक केली आहे. महिलेनं पोलिसांत धाव घेतल्यानंतर संबंधित कारवाई कऱण्यात आली.

प्रेमविवाहाला पाठिंबा दिल्याची दोघा भावांना मिळाली अजब शिक्षा; 34 लाखाचा दंड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गुरुवारी रात्री औषध खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. याचवेळी भाजप नेता आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर काहींनी महिलेसोबत गैरवणूक केली. यानंतर महिलेनं पोलिसांत धाव घेतली असता शुक्रवारी दुपारी पोलिसांनी भाजप नेत्याला घरात घुसून अटक केली. पोलीस सजल घोष यांच्या घराबाहेर उभा होते आणि घोष यांना बाहेर येण्यास सांगत होते. मात्र, ते बाहेर न आल्यानं पोलिसांनी दरवाजा तोडून आत घुसत त्यांना अटक केली. या नेत्यावर महिलेसोबत छेडछेडा केल्याबरोबरच क्लबमध्ये तोडफोड केल्याचाही आरोप आहे.

एकतर्फी प्रेमातून युवकाचा प्रताप; गावभर लावले विद्यार्थीनीचे पोस्टर अन्...

या घटनेबाबत बोलताना भाजप नेते सजल घोष म्हणाले, की मला विनाकारण अटक केली गेली आहे. सजलच्या वडिलांनीही सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप नेत्याच्या अटकेनंतर कार्यकर्ते आक्रमण झाले असून ते पोलीस स्टेशनबाहेरच धरणे आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान भाजप आणि सजल घोष यांच्याकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत.

First published:

Tags: Crime news, TMC, West Bengal bjp