मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /एकतर्फी प्रेमातून युवकाचा प्रताप; 'माझी बायको' म्हणत गावभर लावले विद्यार्थीनीचे पोस्टर, केली अजब मागणी

एकतर्फी प्रेमातून युवकाचा प्रताप; 'माझी बायको' म्हणत गावभर लावले विद्यार्थीनीचे पोस्टर, केली अजब मागणी

परिसरात पोस्टर लागल्याची माहिती मिळताच विद्यार्थीनीनं युवकाला कॉल केला, यावेळी आरोपीनं तिच्याकडे पैशांची मागणी केली. हैराण झालेली विद्यार्थीनी आपल्या कुटुंबीयांसोबत बहोडपुर ठाण्यात पोहोचली

परिसरात पोस्टर लागल्याची माहिती मिळताच विद्यार्थीनीनं युवकाला कॉल केला, यावेळी आरोपीनं तिच्याकडे पैशांची मागणी केली. हैराण झालेली विद्यार्थीनी आपल्या कुटुंबीयांसोबत बहोडपुर ठाण्यात पोहोचली

परिसरात पोस्टर लागल्याची माहिती मिळताच विद्यार्थीनीनं युवकाला कॉल केला, यावेळी आरोपीनं तिच्याकडे पैशांची मागणी केली. हैराण झालेली विद्यार्थीनी आपल्या कुटुंबीयांसोबत बहोडपुर ठाण्यात पोहोचली

भोपाळ 14 ऑगस्ट : एक प्रियकराचं संतापजनक कृत्य नुकतंच समोर आलं आहे. यात विद्यार्थीनीनं लग्नासाठी नकार दिल्यानं प्रियकरानं ती आपली पत्नी असल्याचं सांगतं परिसरात सगळीकडे पोस्टर लावले (One Sided Lover Flags Poster of a Girl as His Wife). हे पोस्टर सोशल मीडियावरही (Social Media) अपलोड करण्यात आले. आरोपी आणि विद्यार्थीनी दोघंही एकाच कोचिंग सेंटरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वालियरमधील बहोडापुर दुर्गा विहार कॉलनीतील आहे.

परिसरात पोस्टर लागल्याची माहिती मिळताच विद्यार्थीनीनं युवकाला कॉल केला, यावेळी आरोपीनं तिच्याकडे पैशांची मागणी केली. हैराण झालेली विद्यार्थीनी आपल्या कुटुंबीयांसोबत बहोडपुर ठाण्यात पोहोचली आणि युवकाविरोधात एफआयआर दाखल केली. पोलीस (Police) सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

6सुना केल्या पण..; भाच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणात नवा खुलासा

बहोडपुरच्या दुर्गा विहार कॉलनीती निवासी असलेली 23 वर्षीय युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. दीड वर्षापूर्वी कोचिंगमध्येच तिची अजय करण उर्फ प्रिंस याच्यासोबत भेट झाली. भेटीनंतर अजयनं तिच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला, जो तिनं स्वीकार केला. विद्यार्थीनीला माहितीही झालं नाही आणि अजय करण तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. मैत्री होताच काहीच दिवसात त्यानं विद्यार्थीनीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला मात्र याला तिनं नकार दिला.

बापरे! आजीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून आरामात राहत होता नातू

लग्नाला नकार दिल्यानंतर अजय करणनं या विद्यार्थीनीला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. अनेकदा समजावूनही अजय करण सुधारला नाही त्यामुळे विद्यार्थीनं त्याच्यासोबतची मैत्रीही तोडली. यानंतर तो तिला बदनाम करण्याची धमकी देऊ लागला. आरोपीनं तिला बदनाम करण्यासाठी संपूर्ण परिसरात तिचा फोटो लावून ही आपली पत्नी असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर सोशल मीडियावरही फोटो अपलोड केले. जेव्हा विद्यार्थीनीनं याचा विरोध केला तेव्हा आरोपीनं पैशांची मागणी केली. यानंतर विद्यार्थीनीनं पोलिसांत धाव घेतली. मात्र, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

First published:

Tags: Crime news, Love