जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Online गेमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी 5 वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या, आधी आईसमोर केला सराव

Online गेमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी 5 वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या, आधी आईसमोर केला सराव

Online गेमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी 5 वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या, आधी आईसमोर केला सराव

सर्व पालकांसाठी ही एक धोक्याची सूचना आहे. तुमचा पाल्य ऑनलाइन गेम खेळत असेल तर त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 13 जानेवारी : तरुणांसह शालेय विद्यार्थ्यांमध्येही ऑनलाइन गेमचं व्यसन वाढत चाललं आहे. काहींना तर या गेमचं इतकं वेड लागतं की, यासाठी ते कोणतीही सीमा गाढू शकतात. याचं ताज उदाहरण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) भोपाळमध्ये पाहायला मिळालं. येथे पाचवीत शिकणाऱ्या सुर्यांश नावाच्या विद्यार्थ्याने ऑनलाइन गेमचं ( online game) टार्गेट पूर्ण करण्यासाठी गळफास घेतला. मुलाला ऑनलाइन गेमचं इतकं वेड लागलं होतं की, त्याने गेम फायटरचा ड्रेसदेखील स्वत:च ऑनलाइन मागवला होता. आईने अनेकदा आपल्या आईसमोर याचा सराव केला होता. इतकच नाही तर मुलगा फास घेताना आईला म्हणायचा की, बघ आई अशी फाशी लावतात. त्यांना वाटलं मुलगा मस्ती करतोय. मात्र मुलाने खरंच गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. एकेदिवशी त्याने गळ्यात फास घालून आईला दाखवलं होतं, यावेळी त्या मुलाला ओरडल्या. बुधवारी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे ही वाचा- आईला शिवीगाळ करताना अडवले अन् लहान भावाने फिरवला मोठ्या भावाच्या गळ्यावर सुरा कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याला फ्री-फायर ऑनलाइन गेमचं व्यसन होतं. तो संधी मिळताच गेम खेळत बसे. कुटुंबीयांनी भर दुपारी त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. यानंतर सुर्यांशला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तो मोबाइल हाती लागताच फ्री फायर गेम डाऊनलोड करीत होता आणि कुटुंबातील कोणी पाहिलं तर गेम डिलीट करीत असे. या घटनेनंतर मध्य प्रदेशातील शिवराज सरतार लवकरच ऑनलाइन गेमवर अक्ट आणण्याच्या तयारीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: game , online , suicide
  • First Published :
जाहिरात
जाहिरात