जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / सोन्याचा कॉईन, 70 किलो सोनं, आणि बिल्डरच्या भोवती आमिषाचा फास, भामट्यांचा 3 कोटींच्या गेमचा महाराष्ट्र पोलिसांकडून दी एन्ड

सोन्याचा कॉईन, 70 किलो सोनं, आणि बिल्डरच्या भोवती आमिषाचा फास, भामट्यांचा 3 कोटींच्या गेमचा महाराष्ट्र पोलिसांकडून दी एन्ड

सोन्याचा कॉईन, 70 किलो सोनं, आणि बिल्डरच्या भोवती आमिषाचा फास, भामट्यांचा 3 कोटींच्या गेमचा महाराष्ट्र पोलिसांकडून दी एन्ड

मीरा भाईंदर आणि वसई विरार आयुक्तालयाच्या क्राईम ब्रांच झोन 2 यूनिटने तीन कुख्यात चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींनी एका बिल्डरला कमी किंमतीत जास्त सोनं देण्याचं आमिष दाखवत लुटलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जुलै : पैशांचा हव्यास बरा नाही, असं म्हटलं जातं ते अगदी खरंच आहे. कारण पैशांचा अतिलोभामुळे आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या एका बांधकाम व्यवसायिकाला याचा प्रत्यय आला. कमी किंमतीत सोनं मिळतं म्हणून या बिल्डरने 3 कोटींचं सोनं घेतलं. पण घरी आल्यावर ते सोनं कसलं ते तर निघालं पितळ! त्यामुळे बिल्डरच्या पायाखालची जमीनच सरकरली. बिल्डरने पोलिसांकडे धाव आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तपासाचे सूत्र हलवत दोन महिन्यांत बिल्डरला लुटणाऱ्या भामट्यांना गुजरात आणि मध्यप्रदेशातून बेड्या ठोकल्या. आरोपींकडून पोलिसांनी दोन कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम जप्तदेखील केली आहे. नेमकं प्रकरण काय? मीरा भाईंदर आणि वसई विरार आयुक्तालयाच्या क्राईम ब्रांच झोन 2 यूनिटने तीन कुख्यात चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींनी एका बिल्डरला कमी किंमतीत जास्त सोनं देण्याचं आमिष दाखवत लुटलं होतं. आरोपींनी बिल्डरला 18 एप्रिलला 70 किलो बनावट सोनं दिलं होतं. त्या सोन्याच्या बदल्यात आरोपींनी बिल्डरकडून 3 कोटी 12 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर ते फरार झाले होते. क्राईम ब्रांचने या प्रकरणातील तीनही आरोपींना गुजरात आणि मध्यप्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांना आरोपींकडे 2 कोटी 19 लाख रुपये रोख रक्कम मिळाली आहे. ( काठ्या, कुऱ्हाडी, कुदळ, फावडे, लोखंडी सळया…, जालन्यात दोन गटात भयानक राडा, पोलिसांचा हवेत गोळीबार ) पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची किसन भाई कस्तूर भाई मारवाजी सलाट, हिरा भाई प्रेमाभाई मारवाडी सलाट आणि मनीष कमलेश भाई शाह अशी नावे आहेत. हे तीनही आरोपी गुजरातच्या बडोद्याचे रहिवासी आहेत. आरोपी आधी नागरिकांना खरं सोनं देवून आमिषाच्या जाळ्यात अडकवतात. त्यानंतर त्यांना खोटं सोनं देवून फसवतात. त्यांच्या कूकृत्यांचा अखेर पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. आरोपींनी बिल्डरला नेमकं कसं लुटलं? डोंबिवलीला राहणारे बांधकाम व्यावसायिक हेमंत मूलचंद वाविया आपल्या मर्सिडीज कारने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सकवार गावाजवळ अॅपेक्स हॉटेलजवळ थांबले होते. यावेळी तीनजण त्यांच्याजवळ आले. ते हेमंत यांच्याशी समोरुन बातचित करायला लागले. आम्हाला खोदकाम करताना भरपूर सोनं सापडलं. ते सोनं आम्हाला विकायचं आहे, असं ते सांगू लागले. त्यांनी हेमंत यांना एक सोन्याचा कॉईन दिला. त्यानंतर त्यांनी हेमंत यांना सांगितलं की, तुम्हाला आणखी सोनं हवं असेल तर आमच्याकडे 70 किलो सोनं आहे. त्यांनी हेमंत यांना आपला मोबाईल नंबर दिला. घरी गेल्यानंतर हेमंत यांनी सोनाराकडे सोन्याचा कॉईन तपासून बघितला तेव्हा तो कॉईन खरंच सोन्याचा होता, असं स्पष्ट झालं. त्यामुळे ते तीन लोकं खरंच सांगत असतील असं हेमंत यांना वाटलं. त्यानंतर हेमंत यांनी दोन दिवसांनी आरोपींनी दिलेल्या फोन नंबरवर कॉल करत त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर हेमंत यांनी आरोपींकडून काही सोनं घेतलं. यावेळीदेखील आरोपींनी हेमंत यांना खरं सोनं दिलं. त्यामुळे हेमंत यांना आरोपींर विश्वास बसला. कमी किंमतीत सोनं मिळत असल्याच्या विचाराने हेमंत लालचात पडले आणि त्याचा फटका त्यांना बसला. त्यांच्यासोबत आरोपींकडून दगाफटका झाला. आरोपींनी हेमंत यांना 8 कोटी रुपयांचं सोनं 3 कोटी रुपयात देवू असं सांगितलं. इतक्या मोठ्या रकमेचं सोनं कमी किंमतीत मिळत असल्याच्या विचाराने हेमंत आनंदी झाले. त्यांनी पैशांची प्रचंड जमवाजमव केली. त्यांनी आपली मर्सिडीज कारदेखील विकली. त्याचबरोबर इतरांकडून कर्ज घेतलं. त्यानंतर पैशांनी भरलेली बॅग घेऊन हेमंत यांनी आरोपींना त्याच हॉटेलजवळ बोलावलं. दोन्ही बाजूने बोलणं झालं. 70 किलो सोन्याचा 3 कोटी 12 लाख रुपयांत सौदा झाला. हेमंत सोनं घेवून घरी गेले आणि आरोपी सर्व पैसे घेवून फरार झाले. घरी आल्यावर हेमंत यांनी आपल्या ओळखीच्या सोनाराकडे सोनं नेलं. त्यावेळी त्यांना सत्य समजल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकरली. आरोपींकडून घेतलेलं 70 किलो सोनं हे सोनं नव्हतं तर पितळ निघालं. हेमंत यांना अखेर प्रचंड पश्चात्ताप झाला. त्यांनी पोलीस ठाण्यात जावून आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने कारवाईला सुरुवात केली. पोलीस निरीक्षक साहूराज रनवरे आणि त्यांच्या टीमने गुजरात आणि उज्जैन येथून आरोपींना बेड्या ठोकल्या. तसेच त्यांच्याकडून एकूण 2 कोटी 19 लाखांची संपत्ती जप्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात