मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

काठ्या, कुऱ्हाडी, कुदळ, फावडे, लोखंडी सळया..., जालन्यात दोन गटात भयानक राडा, पोलिसांचा हवेत गोळीबार

काठ्या, कुऱ्हाडी, कुदळ, फावडे, लोखंडी सळया..., जालन्यात दोन गटात भयानक राडा, पोलिसांचा हवेत गोळीबार

जालन्यात आज दोन गटात तुंबळ राडा झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यात औरंगाबाद महामार्गावर नागेवाडी येथे दोन गट आमनेसामाने आले. यावेळी मोठा गदारोळ झाला.

जालना, 22 जुलै : जालन्यात आज दोन गटात तुंबळ राडा झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यात औरंगाबाद महामार्गावर नागेवाडी येथे दोन गट आमनेसामाने आले. यावेळी मोठा गदारोळ झाला. दोन्ही गटातील आरोपींकडून काठ्या, कुऱ्हाडी, कुदळ, फावडे, लोखंडी सळया यांचा सर्रास वापर करुन प्रचंड राडा घालण्यात आला. प्रचंड थरारक हे नाट्य होतं. विशेष म्हणजे घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. पण पोलिसांना सुरुवातीला या राड्यावर नियंत्रण मिळवणं कठीण झालं होतं. त्यामुळे पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड यांना हवेत गोळीबार करावा लागला. त्यानंतर परिस्थिती निवळण्यात पोलिसांना यश आलं. नेमकं काय घडलं? नागेवाडी येथील बुद्ध विहारासमोर असलेल्या बंद पेट्रोल पंपाच्या जागेजवळ वाघुंडे आणि वाळके यांच्या गटात तुंबळ हाणामारी सुरू होती. या हाणामारीत काठ्या, कुऱ्हाडी, कुदळ, फावडे, लोखंडी सळया याचा सर्रास वापर सुरू होता. ही तुंबळ हाणामारी सुरू असताना जालना येथून पोलीस अधीक्षक कार्यालयातून बैठक आटोपून सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड हे बदनापूरकडे जात होते. यावेळी रामोड यांनी क्षणाचाही वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला. (ठाकरेंना पुन्हा दणका; अवघ्या महिनाभरातच नाशिकच्या मनपा आयुक्तांची उचलबांगडी) मात्र कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. परीस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच रामोड यांनी आपल्याजवळील सरकारी पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. यावेळी घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना तातडीने पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सावळे हे रुग्णालयात जखमीचे जवाब नोंदवित असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
First published:

Tags: Crime, Gun firing

पुढील बातम्या