Home /News /crime /

NGO च्या आड सुरू होता देहविक्रीचा धंदा, पोलिसांनी 2 महिलांची केली सुटका

NGO च्या आड सुरू होता देहविक्रीचा धंदा, पोलिसांनी 2 महिलांची केली सुटका

वसईच्या कृष्णा टाऊनशीप (Krishna Township) या हायप्रोफाईल परिसरात हा प्रकार सुरू होता.

वसई, 17 मार्च : मुंबई (Mumbai) जवळील वसईमध्ये (Vasai) पोलिसांनी एका सामाजिक संस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकून 2 पीडित महिलांचा सुटका केली आहे तर एका महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात वसई पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे, एका सामाजिक संस्थेच्या आड हा गोरखधंदा सुरू होता. आता तरी सूर्यकुमारला संधी द्या', फ्लॉप शो नंतर क्रिकेट फॅन्सची मागणी वसईच्या कृष्णा टाऊनशीप (Krishna Township) या हायप्रोफाईल परिसरात आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकांनी वेगवेगळ्या टीम तयार केल्या आणि सापळा रचला. पोलिसांनी मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास एक बोगस ग्राहक पाठवला होता. त्यानंतर देहविक्रीची पुढे चर्चा झाली. या संस्थेत सेक्स रॅकेट सुरू असल्याची खात्ररजमा झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. अभिनेता सोनू सूद तुम्हाला मिळवून देतोय नोकरी; कुठे, कसा करायचा अर्ज वाचा सविस्तर या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर एका आरोपी महिलेला अटक केली आहे. नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने गुप्त बातमीदारच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime, Fake sex racket, Maharashtra, Mumbai

पुढील बातम्या