नवी दिल्ली, 17 मार्च : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यानं लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात हजारो स्थलांतरीत मजुरांना (Migrant Workers) त्यांच्या घरी जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून दिली. परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना (Students) परत आणणं असो, विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेससाठी (Online Classes) मोबाइल पुरवणं असो किंवा शेतकऱ्यांना (Farmers) ट्रॅक्टर मिळवून देणं असो त्याचं मदतकार्य आजही सुरू आहे. सामाजिक कार्याचा वसा त्यानं कायम ठेवला आहे. आता त्यानं देशातील एक लाख बेरोजगार लोकांना (Unemployed People) काम मिळवून देण्याचा निर्धार केला आहे.
बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्याची घोषणा सोनू सूदनं ट्विटरवरून (Twitter) याबाबत केली आहे. ‘नवं वर्ष, नव्या आशा. नोकऱ्यांच्या नव्या संधी आणि त्या आपल्यापर्यंत आणत आहोत आम्ही. गुडवर्कर अॅप्लिकेशन डाऊनलोड करा आणि उज्ज्वल भविष्याची आशा करा.’ असा संदेश त्यानं दिला आहे.
नया साल, नई उम्मीदें नई नौकरी के अवसर.... और उन अवसरों को आपके करीब लाते, नए हम। प्रवासी रोज़गार अब है गुडवर्कर। आज ही गुडवर्कर एप्लिकेशन को डाउनलोड करें और बेहतर कल की उम्मीद करें App Link: https://t.co/GMX1RW36s5#AbIndiaBanegaKaamyaab #GoodWorker #NaukriPaanaHuaAasaan pic.twitter.com/yV6XTZ5RtD
— sonu sood (@SonuSood) March 14, 2021
दरम्यान सोनू सूद ज्या गूडवर्कर अॅपच्या माध्यमातून नोकरी मिळवून देणार आहे ते नेमकं काय आहे आणि किती सुरक्षित आहे हे जाणून घेऊया.
काय आहे हे गूडवर्कर अॅप?
गूडवर्कर अॅप हे एक नोकरी (Job) मिळवण्यासाठी मदत करणारे अॅप्लिकेशन आहे. नोकरीच्या शोधात वणवण भटकणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी सोनू सूदनं पुढाकार घेऊन हे अॅप दाखल केलं आहे. हे अॅप अत्यंत सुरक्षित असून, त्यात कोणतीही फसवणूक होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.
याचं काम कसं चालतं? :
नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना याद्वारे घरबसल्या नोकरी शोधता येणार आहे. या अॅपवर त्यांना मोफत आपला बायोडेटा शेअर करता येणार आहे. तेदेखील त्यांच्या भाषेत. त्याचा इंग्रजी अनुवाद करून तो कंपन्यांकडे पाठवला जाणार आहे.
हे वाचा - सोनू सुदची पुन्हा मोठी मदत; आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबातील लेकीला नवजीवन
जॉब मॅचिंग टूल : या आधारे योग्य नोकरीची माहिती अर्ज करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
सध्याच्या ठिकाणी नोकरी : ज्या गावात तुम्ही राहात असाल किंवा जिथं नोकरीच्या शोधात असाल त्या ठिकाणच्या नोकऱ्यांबाबत माहिती दिली जाईल.
विश्वासार्ह नोकऱ्या : या अॅपवर असलेल्या कंपन्या आणि नोकऱ्या यांची शहानिशा केलेली असेल. ही सुविधा पारदर्शक असल्यानं फसवणुकीची शक्यता नाही.
नव्या नोकऱ्यांबाबत माहिती : एखाद्या कंपनीत नवीन कामगार भरती होत असेल तर त्याची माहिती हे अॅप देईल. तुमचं राहण्याचं ठिकाण आणि पात्रता यानुसार योग्य नोकऱ्यांची माहिती दिली जाईल.
हे वाचा : अरुण जेटलींची भाची आहे ही टीव्ही अभिनेत्री; असे सुंदर PHOTO पाहून चाहते घायाळ
मुलाखतीबाबत माहिती : एखाद्या ठिकाणी तुमची निवड झाली तर तिथल्या मुलाखतीबाबत सर्व माहिती म्हणजे मुलाखत कधी, कुठे, किती वाजता, पगार, कंपनीच्या संबधित अधिकाऱ्याचा फोन नंबर, ईमेल आयडी अशा सर्व गोष्टींची माहिती दिली जाईल.
अनुभव प्रमाणपत्र : गुडवर्कर अॅपवरून तुम्हाला नोकरी मिळाली आणि तुम्ही स्थलांतरीत मजूर असाल तर पहिल्या ठिकाणच्या कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र दिलं जाईल. ज्यामुळं दुसऱ्या ठिकाणी काम मिळणं सोपं जाईल.
मोफत सेवा : हे अॅप ही संपूर्ण सेवा मोफत देत आहे. याचे सर्व फीचर्स मोफत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Career, Career opportunities, Employment, Job, Sonu Sood