मेरठ, 07 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप नावाचा एक व्यक्ती हेअर सलून चालवतो. दरम्यान तो बेपत्ता झाल्याप्रकरणी मेरठच्या सरूरपूर पोलिस स्टेशनने खळबळजनक खुलासा केला आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या संदीपची त्याचा भाचा जॉनीने गोळ्या झाडून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरूरपूर परिसरातील दहरा गावात राहणारा संदीप (वय 32) हेअर सलून चालवायचा. मागच्या चार दिवसांपूर्वी म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी तो दुकानात होता. दरम्यान, त्याच्या मोबाईलवर कॉल आला आणि तो दुकानातून निघाला. यानंतर संदीप घरी परतलाच नाही. दोन दिवस कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. दरम्यान संदीपच्या घरच्यांना संशय आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली आणि त्यानंतर संदीपचा शोध सुरू झाला.
हे ही वाचा : ठुकरा के मेरा प्यार, लग्नमंडपात एकतर्फी प्रेमातून नवरीसोबत घडला भयंकर प्रकार
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार उसाच्या शेतात लपवून ठेवलेला संदीपचा मृतदेहही ताब्यात घेण्यात आला आहे. पोलीस म्हणाले की जॉनी संदीपची पत्नी प्रीती म्हणजेच मणीसोबत अवैध संबंध होते. यादरम्यान जॉनी आणि प्रीती या दोघांना पोलिसांनी अटक केले आहे.
कॉल डिटेल्स आणि लोकेशनच्या आधारे पोलिसांनी संदीपचा भाचा जॉनीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. प्रत्यक्षात पोलिसांनी संदीपची पत्नी प्रीती आणि जॉनी यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स मिळवले असता, दोघांमध्ये वारंवार बोलणे होत असल्याचे समोर आले. पोलिसांनी चौकशी केली असता कळले की, अविवाहित जॉनी मामा संदीपच्या घरी ये-जा करत असे.
दरम्यान, प्रीती आणि जॉनी यांच्यात प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी संदीपला त्यांच्यातील संबंधाची माहिती मिळाली आणि तो त्यांच्या प्रेमात अडथळा बनू लागला. यामुळे प्रिती आणि भाचा जॉनी यांनी संदीपचा काटा काढण्याचे ठरवले. गुरुवारी दुपारनंतर जॉनीने संदीपला फोन करून कर्नाल हायवेवर कारण सांगून बोलवून घेतले. यानंतर त्यांच्यावर थेट गोळ्या घालून हत्या करून मृतदेह उसाच्या शेतात लपवून ठेवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींच्या सूचनेवरून पोलिसांनी संदीपचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप आणि प्रीती यांचा विवाह 3 वर्षांपूर्वी झाला होता. जॉनी मामाच्या घरी नेहमी जात असायचा. त्याच दरम्यान जॉनी आणि प्रीती यांच्यात सूत जुळले. मेरठचे एसपी देहत अनिरुद्ध कुमार यांनी सांगितले की, मृत संदीपची पत्नी प्रीती हिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत कसून चौकशी केली जात आहे. संदीपची पत्नी प्रीती आणि पुतण्या जॉनी यांच्यात संबंध असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. बहुधा याच कारणामुळे ही घटना घडली असल्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : दिराने लाज सोडली, वहिणीचा अंघोळीचा व्हिडीओ केला रेकॉर्ड अन्… बीडमधील घटना
पोलिसांनी आरोपी पुतण्या जॉनी आणि संदीपची पत्नी प्रीती यांना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला जात आहे. त्याचबरोबर पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई केली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.