बीड, 07 फेब्रुवारी : बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंघोळ करतांनाचा विडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन दिरांनी विवाहितेवर बलात्कार केल्याची खळबजनक घटना बीडच्या गेवराई शहरांत उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून दोघा आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकारामुळे नात्याला काळीमा फासल्याने खळबळ उडाली.
पाच ते सहा महिन्यांपूर्वी पती बाहेर गेल्यानंतर मोठा दीर जेवणासाठी घरी आला. जेवण दिल्यानंतर दिराने आवाज देत बोलावून घेत मोबाईलमध्ये मध्ये एक व्हिडिओ दाखवला. विवाहिता अंघोळ करतानाचा व्हिडिओ होता.
हे ही वाचा : कापलेली करंगळी हातात घेऊन ती पोहोचली पोलीस ठाण्यात; घटना ऐकून पोलीसही हादरले, महिलेच्या धाडसाचं कौतुक
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत याने शारीरिक सुखाची मागणी केली. विवाहितेने सगळा प्रकार सासऱ्यांना सांगितला. परंतु त्यांनी विश्वास ठेवला नाही. उलट माझ्या मुलावर माझा विश्वास आहे असे सांगून वेळ मारून नेली.
त्यानंतरही घरी एकटे असल्याचा गैरफायदा घेत दिराने अत्याचार केला. काही दिवसांनी मावस दिरास घरी आणून त्याने गाडी घेण्यासाठी मदत केल्याने त्याच्यासोबत संबंध ठेव असे सांगितले. नकार देताच मावस दिराने देखील अत्याचार केला.
हे ही वाचा : आधी केले शारीरिक अत्याचार मग विळ्यानं कापला गळा; आईच्या वयाच्या महिलेसह 16 वर्षांच्या मुलाचं कृत्य
त्यानंतर पिडीतेने आई-वडिलांना याची माहिती दिली. त्यांच्या मदतीने पिडीतेने गेवराई पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.