बारबांकी (उत्तर प्रदेश) 12 फेब्रुवारी : एका शिक्षिकेला (Teacher) तिचं विद्यार्थीनीला (Student) ऑनलाईन क्लासमध्ये रागवणं भलतंच महाग पडलं आहे. शिक्षिकेनं रागवल्यानं संतापलेल्या विद्यार्थीनीनं त्यांचा बदला घेण्यासाठी फेसबुकवर (Facebook) फेक आयडी (Fake ID) बनवून शिक्षिकेवर अश्लिल कमेंट केले. इतकचं नाही तर शिक्षिकेच्या घरच्यांनाही त्या आयडीवरुन मेसेज केले आणि फोटो पाठवले. त्यानंतर या शिक्षिकेनं प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली. तेव्हा पोलीस तपासात या विद्यार्थीनीचं हे कृत्य उघड झालं आहे.
( वाचा : संतापजनक! उकळत्या पाण्यात टाकून सावत्र आईकडून दोन वर्षाच्या चिमुकल्याची हत्या )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बारबंकी मधील हा सर्व धक्कादायक प्रकार आहे. या प्रकरणातील आरोपी विद्यार्थीनी ही बिकॉमची विद्यार्थीनी आहे. तिला तिच्या शिक्षिकेनं ऑनलाईन क्लासमध्ये रागावले होते. क्लासमध्ये रागवल्याच्या संतापातून तिनं शिक्षिकेचा बदला घेण्याचा निश्चय केला.
(वाचा - रहस्यमय! अल्पवयीन मुलीच्या गर्भातून कसं गायब झालं भ्रूण? CID करणार तपास)
त्यानंतर या विद्यार्थीनीनं महिला शिक्षिकेच्या नावानं फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) फेक आयडी बनवला. त्या आयडीवर ती मुलगी अश्लील कमेंट पोस्ट करत होती. त्याचबरोबर शिक्षिकेच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या सर्वांनाही घाणेरडे मेसेज पाठवले. तसंच ती त्या शिक्षिकेला देखील शिवीगाळ करत होती.
( वाचा - एका पॉर्न व्हिडीओतून 'इतके' पैसे कमवायची गहना वशिष्ठ, पोलिसांसमोर मोठे खुलासे )
महिला शिक्षिकेला या प्रकरणाची माहिती कळताच त्यांनी याची पोलिसांकडं तक्रार केली. पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेलकडं सोपवले. सायबर सेलच्या तपासात आरोपीचा छडा लागला. सायबर सेलच्या क्राईम टीमनं IP अॅड्रेसच्या मदतीनं विद्यार्थीनीला पकडले. या विद्यार्थीनीनं तिचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला समज देऊन सोडले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Cyber crime, Defamation, Social media, Uttar pradesh