मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अल्पवयीन मुलीच्या गर्भातून चार आठवड्यांचं भ्रूण गायब, CID करणार प्रकरणाचा तपास

अल्पवयीन मुलीच्या गर्भातून चार आठवड्यांचं भ्रूण गायब, CID करणार प्रकरणाचा तपास

अल्पवयीन (Minor) मुलीच्या गर्भातून 4 आठवड्यांचं भ्रूण कोठे गेलं, याचा शोध आता थेट सीआयडी (CID) घेणार आहे. उच्च न्यायालयानं (High Court) याप्रकरणी लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Published by:  Kiran Pharate

शिमला 12 फेब्रुवारी  : अल्पवयीन (Minor) मुलीच्या गर्भातून 4 आठवड्यांचं भ्रूण कोठे गेलं, याचा शोध आता थेट सीआयडी (CID) घेणार आहे. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयानं (Himachal High Court) मंडी जिल्ह्यातील खटल्याची चौकशी करण्याचं काम सीआयडीकडं सोपवलं आहे. याप्रकरणी लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या युवकास न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2020 मध्ये जेव्हा अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखायला सुरुवात झाली तेव्हा ती तिच्या आईबरोबर तपासणीसाठी रुग्णालयात गेली. तपासणीदरम्यान, अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे उघडकीस आलं. अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भाशयात चार ते आठ आठवड्यांचा एक गर्भ आढळला. अल्पवयीन गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी तिच्या आईला सांगितलं होतं.

आईनं आपल्या मुलीला याबद्दल विचारणा केली, मात्र काहीही माहिती होऊ शकलं नाही. यानंतर संशयाच्या आधारे आईनं एका तरूणाविरोधात पोलिसांत तक्रार दिली. यानंतर पॉक्सो कायद्यांतर्गत (Pocso Act)  पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी पुन्हा आरोग्य संस्थेत या अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, गर्भ सापडला नाही. पहिल्यांदा तपासणी केलेले डॉक्टर यानंतर आश्चर्यचकित झाले. हा अहवाल समोर आल्यानंतर पोलिसही आश्चर्यचकित झाले.

पोलिसांसमोरही या अल्पवयीन मुलीनं संशयित तरूणावर कोणताही आरोप केला नव्हता. पोलिसांना 60 दिवसांच्या आत न्यायालयात पुराव्यासहीत आरोपीला हजर करायचं होतं. मात्र, पोलिसांना तपासात काहीच सापडले नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट तयार करण्यात आला. परंतु आरोपी युवकाला जामीन मिळाला नाही आणि जामिनासाठी तो उच्च न्यायालयात पोहोचला. आता संबंधित युवकाला जामीन मिळाला आहे, परंतु अल्पवयीन मुलीच्या पोटातून गर्भ गायब झाला आहे, याचं पोलिसांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही. तपासणी करणारे डॉक्टरही त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले. अशा परिस्थितीत उच्च न्यायालयानं तपास सीआयडीकडं सोपविला आहे.

First published:

Tags: Rape, Rape on minor