मुंबई 12 फेब्रुवारी : पॉर्न रॅकेट प्रकरणी गंदी बात फेम गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) रविवारी ताब्यात घेतलं होतं. यानंतर 14 फेब्रुवारीपर्यंत ती पोलीस कोठडीत आहे. गहना वशिष्ठनं चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. गहनानं मुंबई पोलिसांना सांगितलं, की एक व्हिडीओ अपलोड करण्याच्या बदल्यात तिला अमेरिकेतील एका व्यक्तीकडून दोन ते अडीच लाख रूपये मिळत होते. यातील जवळपास एक ते दीड लाख रुपये ती स्वतःकडे ठेवायची. म्हणजे पॉर्न व्हिडीओ बनवण्याच्या बदल्यात हा तिला मोबदला मिळायचा. गहनानं आतापर्यंत जवळपास 87 पॉर्नोग्राफी व्हिडीओ शूट केले आहेत. हे व्हिडीओ तिनं आपल्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. एका प्रोडक्शन हाऊसमधील 5 लोकंही अटकेत - मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉर्न फिल्म शूटींग रॅकेटमध्ये बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे. याआधी पोलिसांनी पॉर्न फिल्म बनवणाऱ्या एका प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश केला होता. ही कंपनी स्ट्रगलिंग कलाकारांकडून शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचं अॅग्रीमेंट करून न्यूड शूट करून घेत असत तसंच नकार दिल्यास केस करण्याची धमकी देत असे. याप्रकरणी पोलिसांनी मालाड पश्चिममधील ग्रीन पार्क बंगल्यात छापा मारत 5 लोकांना अटक केली होती. या 5 लोकांनाही केली होती अटक - यात 40 वर्षीय फोटोग्राफर यास्मीन खान आणि ग्राफिक्स डिझायनर प्रतिभा नलावडे यांचाही समावेश आहे. प्रतिभा पॉर्न फिल्मच्या प्रोडक्शनची इन्चार्ज होती. तर, तीन पुरुषांमध्ये मोनी जोशी कॅमेरामन आणि लाईटमॅनच काम करायचा. भानू ठाकूर आणि मोहम्मद नासिर अभिनय करायचे. प्रॉपर्टी सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे याप्रकरणाचे तक्रारदार आहेत. या पाचही आरोपींना पोलिसांनी पाच दिवसांसाठी तुरूंगात पाठवलं आहे. यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी रविवारी गहना वशिष्ठला अटक केली आहे. 36 लाख रुपये पोलिसांनी केले जप्त - प्रॉपर्टी सेलच्या म्हणण्यानुसार, फिल्म प्रोडक्शन कंपनीनं Hothit Movies नावाचं एक अॅपही बनवलं आहे. यावर ते आपल्या पॉर्न फिल्म अपलोड करत असत. या अॅपलिकेशनसाठी ते 2 हजार रुपये सबस्क्रीप्शन फी घ्यायचे. पोलिसांनी याप्रकरणी 6 मोबाईल फोन, एक लॅपटॉप, लाईट स्टॅण्ड, कॅमेऱ्यांसहित 5 लाख 68 हजारांचं सामान जप्त केलं आहे. यासोबतच पॉर्न फिल्मच्या माध्यमातून कमवलेले 36 लाख 60 हजार रुपयेदेखील जप्त केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.