जॉर्डन, 12 फेब्रुवारी : एका सावत्र आईने दोन वर्षाच्या चिमुकल्याची उकळत्या पाण्याने आंघोळ घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या वडिलांनी त्याच्या सावत्र आईला त्याच्या दोन आणि चार वर्षांच्या मुलांना सांभाळण्यास सांगितलं होतं. त्यानंतर झालेल्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे.
सावत्र मुलांना सांभाळण्यावरुन झालेल्या वादातून हे कृत्य केल्याचं समोर आलं. सावत्र मुलांचा जबरदस्तीने सांभाळ करायला सांगितला असल्याने महिलेने त्याचा बदला घेत दोन वर्षाच्या चिमुकल्याची निर्घुण हत्या केली. सावत्र आईने मुलाची हत्याच केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता कोर्टाने तिला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे.
दरम्यान, 1 ऑक्टोबर 2018 मध्ये जॉर्डन शहरात ही धक्कादायक घटना घडली. मुलाची हत्या करण्यापूर्वी त्या क्रूर महिलेने या दोन आणि चार वर्षाच्या मुलांसोबत मारहाण आणि गैरवर्तन केल्याची बाबही कोर्टात समोर आली. कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने बाथटबमध्ये उकळत्या पाण्यात या मुलाला ठेवून त्यांची हत्या केल्याचं मान्य केलं आहे.
चिमुकल्याला उकळत्या गरम पाण्यात बाथटबमध्ये ठेवलं आणि ज्यावेळी तो ओरडू लागला, किंचाळू लागला त्यानंतर तिने त्याला बाथटबमधून बाहेर काढलं आणि भाजलेल्या अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. परंतु गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत असलेल्या चिमुकल्याचा 15 दिवसांनी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
2019 मध्ये त्या महिलेला 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु बचाव पक्षाने कोर्टाच्या या निर्णयाला सर्वाच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. परंतु जॉर्डनच्या सर्वोच्च न्यायालयानेही मुलाची निर्घुणपणे हत्या केल्याप्रकरणी महिलेला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Horrifying, International, Murder, Small baby