मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

माथेफिरूनं लावली उभ्या कारला आग, 5 मिनिटांत झाला गायब; पाहा VIDEO

माथेफिरूनं लावली उभ्या कारला आग, 5 मिनिटांत झाला गायब; पाहा VIDEO

गल्लीत उभ्या (Unknown man sets car on fire parking on the street) असणाऱ्या कारला एका माथेफिरूनं आग लावल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे.

गल्लीत उभ्या (Unknown man sets car on fire parking on the street) असणाऱ्या कारला एका माथेफिरूनं आग लावल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे.

गल्लीत उभ्या (Unknown man sets car on fire parking on the street) असणाऱ्या कारला एका माथेफिरूनं आग लावल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे.

  • Published by:  desk news

पानीपत, 25 नोव्हेंबर: गल्लीत उभ्या (Unknown man sets car on fire parking on the street) असणाऱ्या कारला एका माथेफिरूनं आग लावल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे. रस्त्यावर पार्क केलेल्या कारपाशी हा तरुण आला, कारवर (Burning car video goes viral) पेट्रोल टाकलं आणि आग लावली. पाहता पाहता कारनं पेट घेतला आणि काही मिनिटांतच कारचा कोळसा झाला. आग लावून शांतपणे हा तरुण (Mental youth in CCTV footage) निघूनही गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आलं आहे. " isDesktop="true" id="635110" >

माथेफिरूनं लावली आग

हरियाणाच्या पानीपतमध्ये रस्यावर उभ्या असणाऱ्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे आजूबाजूचे नागरिक रस्त्यावर आले. या भागात राहणाऱ्या हरी सिंह यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची सँट्रो कार रस्त्यावरच उभी होती. माथेफिरू ऍक्टिव्हा गाडीवरून आला आणि या कारपाशी थांबला. सोबत आणलेले पेट्रोल त्याने कारवर ओतले आणि कारला आग लावली. पेट्रोल ओतल्यामुळे कारने काही क्षणांतच पेट घेतला आणि कारचा अक्षरशः कोळसा झाला. कारचं नुकसान केल्यानंतर हा तरुण त्याच्या बाईकवर बसून शांतपणे निघून गेल्याचं परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आलं.

मनोरुग्ण की गुंड?

रस्त्यात उभ्या असणाऱ्या कारला विनाकारण आग लावणारी ही व्यक्ती माथेफिरू किंवा मनोरुग्ण असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हरी सिंह यांचं कुणाशी वैमनस्य होतं का आणि त्यातून हा प्रकार घडला आहे का, याचीदेखील चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.

हे वाचा-लसीकरणाचे विरोधक भरवतात COVID पार्टी, कोरोना रुग्णांना मारतात मिठ्या

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी कार पेटवल्याची तक्रार नोंदवून घेतली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलीस आऱोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमागचं नेमकं कारण काय असावं, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे जे नागरिक रस्त्यावर कार पार्क करतात, त्यांच्या मनात दहशत निर्माण झाल्याचं वातावरण आहे.

First published:

Tags: Burning car, Car, Mental health, Videos viral