मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लसीकरणाचे विरोधक भरवतात COVID पार्टी, कोरोना रुग्णांना मारतात मिठ्या; जीव गमावूनही प्रकार सुरूच

लसीकरणाचे विरोधक भरवतात COVID पार्टी, कोरोना रुग्णांना मारतात मिठ्या; जीव गमावूनही प्रकार सुरूच

लसीकरणाला विरोध (man dies from coronavirus after attending covid party) करण्यासाठी काही नागरिक एकत्र येऊन कोरोना रुग्णांसह पार्टी करत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

  • Published by:  desk news

बोल्झॅनो, 25 नोव्हेंबर: लसीकरणाला विरोध (man dies from coronavirus after attending covid party) करण्यासाठी काही नागरिक एकत्र येऊन कोरोना रुग्णांसह पार्टी करत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या नागरिकांचा कोरोना लसीकऱणाला (oppose corona vaccination) विरोध आहे. कोरोना हा काही जीवघेणा आजार नसून त्याचा विनाकारण बाऊ केला जात असल्याचा या नागरिकांचा दावा आहे. तो सिद्ध करण्यासाठी ते दर (Covid patient in party) पार्टीत एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बोलावतात. सगळेजण त्याच्यासोबत पार्टी करतात, त्याला मिठ्या मारतात आणि आपल्याला कोरोना झाला तरी काहीच होत नसल्याचं सिद्ध करतात.

नागरिकाचा गेला जीव

इटलीतील बोल्झॅनो शहरात लसीकरणाला विरोध करणाऱ्यांचा एक गट सक्रीय आहे. या गटाच्या दाव्यानुसार कोरोना प्रतिबंधक लस ही अनावश्यक बाब असून प्रत्येकाचं शरीर कोरोनाविरोधात अँटिबॉडिज तयार करण्यासाठी सक्षम असतं. जर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल, तर कोरोना विषाणूचा शरीरारावर कुठलाही विपरित परिणाम होत नाही, असा त्यांचा दावा आहे. मात्र याच पार्टीत काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रियातील एक 55 वर्षांचे नागरिक आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हे वाचा- उत्तर कोरियात यापुढे लेदर जॅकेटवर बंदी, कारण वाचून होईल हुकूमशाहीची जाणीव

जाणूनबुजून पसरवतात कोरोना

लसीकरणाला विरोध असणाऱ्या नागरिकांचा हा गट जाणूनबुजून कोरोना विषाणू पसरवत असल्याचा ठपका इटलीच्या प्रशासनानं त्यांच्यावर ठेवला आहे. प्रत्येक पार्टीला एक कोरोनाबाधित व्यक्ती बोलावणं आणि त्याला मिठ्या मारून कोरोनाचा फैलाव करणं हे देशविरोधी कृत्य असल्याचं काही नागरिकांचं म्हणणं आहे. ज्यांना लस घ्यायची नसेल, त्यांना ती न घेण्याचा अधिकार असला, तरी जाणीवपूर्वक कोरोना फैलावेल, अशी कृती करणं, हे बेकायदेशीर असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे.

First published:

Tags: Corona, Italy, Vaccination