जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / Nagpur Unlock : नागपूरमध्ये नियमावलीत बदल, अत्यावश्यक दुकानं 5 तर बार 10 वाजेपर्यंत सुरू!

Nagpur Unlock : नागपूरमध्ये नियमावलीत बदल, अत्यावश्यक दुकानं 5 तर बार 10 वाजेपर्यंत सुरू!

लोकल प्रवाशांकडे ओळखपत्र खोटे आढळल्यास त्यांच्याकडून तसंच ज्यानी खोटे प्रमाणपत्र प्रमाणीत केले असेल त्यांच्याकडून रु. ५००/- इतका दंड ...

लोकल प्रवाशांकडे ओळखपत्र खोटे आढळल्यास त्यांच्याकडून तसंच ज्यानी खोटे प्रमाणपत्र प्रमाणीत केले असेल त्यांच्याकडून रु. ५००/- इतका दंड ...

नागपूरमध्ये काही निर्बंधासह व्यवहार हे सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 07 जून : राज्यात(Maharashtra Corona cases) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अनलॉक (Maharashtra Unlock) करण्यात आले आहे. कोरोनाची हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूरमध्येही (Nagpur) लॉकडाऊनच्या (Lockdown) अटी शिथिल करण्यात आल्या आहे.  नागपूर शहराचा समावेश पहिल्या श्रेणीत असला तरी सरसकट सूट देण्यात आली नाही. नागपूरमध्ये काही निर्बंधासह व्यवहार हे सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. थिएटर, मॉल, हॉटेल, रेस्टारंट हे 50 टक्के क्षमतेने सुरू असणार आहे. तर लग्नासाठी 100 लोकांची परवानगी असणार आहे. लग्न हॉलमध्ये असेल तर हॉलच्या 50 टक्के क्षमतेच्या उपस्थितीत लग्न करता येणार आहे.

‘‘कोविडला आमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही’’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अंत्यविधीला 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. शाळा, कॉलेज, जलतरण केंद्र, सार्वजनिक कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रमावर पूर्णपणे बंदी असणार आहे. असे आहे नागपूरमध्ये नियम - आवश्यक वस्तू दुकाने - संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील - इतर दुकाने ( अत्यावश्यक वगळून ) संध्याकाळी 5 वाजे पर्यंत सुरू राहील - रेस्टारंट, बार 50 capacity ने रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहील - वॉकिंग सकाळी 5 ते 9, संध्याकाळी 5 ते 9 राहील - सरकारी व खाजगी ऑफिस 100 टक्के उपस्थितीने संध्याकाळी 5 वाजेपर्यंत   - मॉल्स, थिएटर, मल्टिप्लेक्स संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहणार.. (मॉल्समधील मल्टीप्लेक्स मधील, थिएटर मधील लास्ट शोही 5 वाजता संपेल..) - खेळाचे मैदान, क्रीडांगण, उद्यान सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत - लग्न - 100 लोकांपर्यंत मर्यादा किंवा मंगल कार्यालयाची, हॉल च्या 50 टक्के क्षमता ( जे काही कमी असेल) - अंत्यसंस्कार जास्तीत जास्त 50 लोकांपर्यंत - जिम, सलून, पार्लर संध्याकाळी 5 वाजेपर्यत.. - स्कुल, कॉलेज, कोचिंग क्लास बंद राहतील, त्यांचे प्रशासकीय काम सुरू राहू शकेल - धार्मिक स्थळ बंद राहतील ( समितीचे 5 लोकं दैनंदिन पूजा आणि स्वच्छतेसाठी जाऊ शकतील ) अमरावती जिल्हा तिसऱ्या फेजमध्ये तर दुसरीकडे,  अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता मोठ्या प्रमाणात आटोक्यात यायला लागलेली आहे. जिल्ह्यात कोरोना positivity दर 5.35 टक्यावर पोहोचलेला आहे. शहरातील रुग्ण संख्या कमी होत आहे मात्र ग्रामीण भागातील रुग्ण संख्या अजूनही कमी होताना दिसत नाही, त्यामुळे प्रशासनापुढे आव्हान ठरले आहे. अमरावती जिल्ह्यात सकाळी सात ते चार यादरम्यान सगळे दुकाने व आस्थापना सुरू राहणार आहेत. जीवनावश्यक दुकाने सकाळी सात ते चार या दरम्यान सुरू राहणार आहे. तर  इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 4 पर्यंत सुरू राहणार आहे.

जिल्हा प्रशासनाचं डिजिटल पाऊल; पुण्यात महसुली खटल्यांची होणार ऑनलाईन सुनावणी

 कसं असेल आजपासून राज्यातील अनलॉक पहिला स्तर - पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड 25% पेक्षा कमी भरलेले आहेत. या टप्प्यात सर्व व्यवहार खुले करण्यात येतील. दुसरा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट 5% आणि ऑक्सिजन बेड 25% ते 40% भरलेले आहेत, असे जिल्हे तिसरा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट 5% ते 10% आणि ऑक्सिजन बेड 40% हून अधिक भरलेले आहेत. याठिकाणी व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील. चौथा स्तर- पॉझिटिव्हिटी रेट 10% ते 20% आणि ऑक्सिजन बेड 60% असलेले जिल्हे. सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील. पाचवा स्तर- पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्याहून अधिक आणि 75% टक्क्याहून अधिक ऑक्सिजन बेड भरलेले जिल्हे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात